Homeसंपादकीयनेत्यांची झाली बत्ती गुल , कार्यकर्ते लई पावरफुल्ल

नेत्यांची झाली बत्ती गुल , कार्यकर्ते लई पावरफुल्ल

भादवण ( अमित गुरव ) -: निवडणूक सोसायटी ची होती की पंचवार्षिक असाच प्रश्न तालुक्यातील अनेक लोकांना पडला होता. इतकी चुरस आणि गावातील सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती हे ग्रामस्थ आणि मतदार ओळखुन होते. मी निवडून येणारच या अविर्भावात सर्व असताना मात्र सुज्ञ मतदारांनी आपल्याला यापूर्वी कोणी मदत केली आणि कोणी नाही हे मनात ठेवून तर काहींनी धाडसाने आपल्याच नेत्यांना माझ्या वाईट प्रसंगी कुठे होता , आता तुम्हाला माझी आठवण झाली का असा रोखठोक प्रश्न विचारला. त्यामुळे मतदानाच्या आदल्या दिवशी मतदार उमेदवारांची झोप उडवनार हे निश्चित होते.


निवडणुकी मध्ये 459 पैकी 449 मतदान पडले त्यात 6 मयत आणि 4 बाहेरगावी असल्याने 3वाजून 30 मि. सर्व नेते आणि कार्यकर्ते थोडे निवांत होते तोच मतमोजणी सुरू झाली आणि लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. निकाल आता येतो नंतर येतो म्हणून सर्वांचे डोळे आणि कान एका विशिष्ट ठिकाणी केंद्रित झाले होते. वरचेवर काहीतरी बातम्या येत होत्या पण त्या प्रश्नचिन्ह घेऊनच त्यामुळे पारडे कोणाचे जड होणार यांचा अंदाज बांधण्यापलीकडे कोणी काही करू शकत नव्हते.
दिवस सरतेशेवटी जवळपास रात्री 8 च्या सुमारास बातमी आली आणि कार्यकर्त्यांचा दाबून ठेवलेल्या उत्साह बाहेर येण्याचा मार्ग मोकळा होऊन 9-3 च्या फरकाने शिवसेना प्रणित युवा शेतकरी विकास पँनेल भरघोस मतांनी विजयी झाले. विजयी पँनेल च्या उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोशी वातावरणात एकमेकांना शुभेच्छा दिल्या .आपल्या विषयाचे श्रेय कार्यकर्त्यांनी केल्या मेहनतीला जाते अशी मते उमेदवारांनी मांडली.
तर सत्ताधारी गटातून बाहेर पडलेल्या एका कार्यकर्त्याने आता त्यांना कार्यकर्त्यांची किंमत कळेल अशी कडवट प्रतिक्रिया देत आपली भावना व्यक्त केली. त्यासोबत नेत्यांची झाली बत्ती गुल्ल कार्यकर्ते लई पावरफुल्ल अशी अप्रत्यक्ष घोषणा करून सत्ताधारी लोकांच्या कानपिचक्या घेतल्या .

विजयी उमेदवार -:

युवा शेतकरी विकास पँनेल

१) कुंभार रत्नपा गणपती
२) पांडुरंग कोंडीबा केसरकर
३) डोंगरे दशरथ धोंडिबा
४) देसाई मारुती ईश्वर
५) पाटील दत्तात्रय अंबाजी
६) केसरकर रत्नाबाई केदारी
७) पाटील रुक्मिणी तुकाराम
८) गुरव अशोक रामचंद्र
९ ) कांबळे संभाजी विठोबा

शेतकरी महाविकास आघाडी भादवण

१) गोपाळ हरी केसरकर
२) गाडे गजानन यल्लपा
३) जोशीलकर पांडुरंग रामचंद्र

खालील लिंक मध्ये तुम्ही विजयानंतरचा लिंक मराठी प्रतिनिधी ने घेतलेला live घेतलेला जल्लोष पाहू शकता

https://fb.watch/coR66MqWKg/

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular