परवा दिवशी कंपनीच्या कामा निमित्त हरी ओम हार्डवेअर, इलेक्ट्रिकल या दुकानात गेलो होतो. मला लागणाऱ्या साहित्यांची लिस्ट तेथील काम करत असणाऱ्या महेंद्रला दिली. आणि मी इकडे तिकडे पाहण्यात गुंतलो होतो. शेजारी एक व्यक्ती उभे होते, मोबाईल सापडला आहे असे ते सांगत होते. मी कधी पण माणसाचा चेहरा पाहून ठरवतो कि,या अनोळखी व्यक्ती संगे बोलायचे कि नाही कारण बऱ्याच लोकांना अटीट्युड खूप असतो.
पटेल साहेबांना पाहिल्यावर वाटले हा माणूस खूप चांगला आहे यांच्याशी बोलायला हवे. त्यांना म्हणालो, साहेब तुमच्या सारखे प्रामाणिक लोक खूप कमी आहेत. तर ते म्हणाले कि, मी गाडीवरून जात असताना एक स्त्री स्कुटी वरून फास्ट जात होती आणि तिचा मोबाईल खाली पडला. मी ते बघितले आणि माझी गाडी थांबून तो मोबाईल घेतला. त्या मॅडम स्पीड मध्ये होत्या त्यामुळे बोलणे झाले नाही. पण त्यामधील लास्ट कॉल चेक करून त्या नंबर वर फोन करून माझे बोलणे झाले. एक व्यक्ती येणार आहे हा मोबाईल घेण्यासाठी.
परत एकदा पटेल साहेबांना म्हणालो कि, तुमचे खूप कौतुक आणि हरी ओम हार्डवेअरचे मालक पवार सर, यांना म्हणालो कि, अभी के जमाने में इमानदार लोग बहोत कम मिलते हैं| चोर लोग जादा हैं| तेव्हा ते म्हणाले कि, हां एकदम बराबर. पटेल साहेब म्हणाले कि, ज्याचा मोबाईल आहे त्याला मिळाले म्हणजे माझे काम झाले. त्यांना मी चेष्टेने म्हणालो कि, आप के जगह मैं रहता तो मोबाईल लेके भाग जाता था | तेव्हा ते हसत म्हणाले कि, मला कांही कमी नाही, माझा मुलगा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे आणि त्याला 20 लाखांचे पॅकेज आहे. मी टेक्निसियन आहे आणि मला दररोज 5 हजार रुपये मिळतात.
पटेल साहेब बी. एस.सी. झाले आहेत आणि त्यांना मशीन मेन्टेनन्सचा खूप वर्षांचा अनुभव आहे. ते राजकोट या शहरातील आहेत.
आमचे दोघांचे बोलणे चालू होते तेव्हा पवार सर यांनी सांगितले कि, मागच्या वेळी एकदा माझ्या दुकानात एक स्त्री नुकतेच लग्न करून कांही तरी घेऊन जाण्यासाठी आली होती. लग्नाची साडी आणि केंसावर तांदूळ तसेच पडलेले होते. त्या येथे साहित्य घेऊन गेल्या आणि मी माझे दुकान बंद करून गेलो. मला गावी दीड महिने जायचे होते त्यामुळे मी व्यवस्थित सर्व बंद करून गेलो. दीड महिन्या नंतर जेव्हा दुकान उघडले तेव्हा मला एक बॅग दिसली. मी उघडून पाहिले तर त्यात सोने 16 तोळे होते आणि एका कपड्यांच्या दुकानाचे बिल होते. मी लगेच त्या नंबर वर फोन करून बिल नंबर सांगून त्या स्त्रीचा नंबर घेतला. फोन केल्यावर ती स्त्री दुकानात आली आणि मी ती बॅग तिला दिली. पाठीमागे लगेच तिचा पती येऊन त्याने माझे खूप आभार मानले आणि 20000 रुपयांचे बंडल माझ्या टेबलवर ठेवले. मी त्यांना म्हणालो कि, साहेब नको मला, तुम्ही ठेवा ते खूप विनंती करत होते पण मी घेतलो नाही. शेवटी त्यांनी शेजारी असलेल्या हॉटेल मध्ये जाऊन मला थंडगार पेय दिले. तेथे समजले कि, त्या नव विवाहित मुलीने घाबरून सोने हरवले आहे हे सांगितले नाही.
ती स्त्री सोने मिळाले म्हणून इतकी भावनिक आणि आनंदी झाली होती कि, ती रडत होती, अगदी जाऊ पर्यंत. त्यावेळी मी म्हणालो कि, त्या मुलीचे लग्न नुकतेच झाले होते, नवीन लग्न म्हटल्यावर गोडी गुलाबीचे दिवस असतात पण त्या स्त्रीला टेन्शन मध्ये दिवस घालवावे लागले असतील. हसत म्हणालो कि, देवाने तुमच्या अकाउंट मध्ये एक पुण्य काम जमा केले. पटेल साहेबांना पण म्हणालो कि, तुमच्या सुद्धा अकाउंट मध्ये जमा झाले.
पटेल साहेबांना काम होते त्यामुळे त्यांना जाणे गरजेचे होते. ते खूप वेळेपासून मोबाईल घेऊन जाणाऱ्या व्यक्तीची वाट पाहत होते. ते लगेच एका नंबर वर फोन करून तो मिळालेला मोबाईल माझ्या हातात दिला आणि म्हणाले कि, त्या व्यक्तीचा फोन आहे तुम्ही पत्ता सांगा. मी फोन उचलला आणि, मी हॅलो म्हणालो. पुढील व्यक्ती म्हणाली कि, कोठे आहात आपण? मी हसलो आणि म्हणालो तुमच्या बाजूला. हसत म्हणालो कि, पटेल साहेब तुम्ही चुकून या नंबर वर फोन केला आहात.
तितक्यात ती व्यक्ती आली आणि पटेल साहेबांनी खात्री करून तो मोबाईल दिला. मोबाईल घेऊन जाण्यासाठी मुस्लिम व्यक्ती आली होती. त्यांनी पटेल साहेबांचे आभार मानले. आणि त्या व्यक्तीने सांगितले कि, मी अमुक ठिकाणी राहतो कधी आला तर मला फोन करा. मी लगेच म्हणालो कि, पटेल साहेब ते तुमचा पाहुणचार करतील. ती व्यक्ती आणि आम्ही दोघे हसायला लागलो. त्यांना म्हणालो कि, मी पण येईन पटेल साहेबांसंगे. तेव्हा ते हो या जरुर म्हणाले. पटेल साहेब आणि त्या व्यक्ती बरोबर सेल्फी काढला. तसेच पवार साहेबांसंगे सुद्धा फोटो काढला. मी म्हणालो राजकारणी लोक सध्या जाती वरून हिंदू मुस्लिम करत वाद लावत आहेत पण आपले सारखे सामान्य लोक गोडी गुलाबीने राहत आहेत. त्या व्यक्तीने हो म्हणत, माझा हात हातात घेतला आणि शेक हॅन्ड केला. पटेल साहेबांना म्हणालो आपण भेटू असेच कधीतरी. आम्ही तिघांनी एकमेकांचे व्हिजिटिंग कार्ड एकमेकांना दिले. त्यांना आणि पवार साहेबांना बाय बाय करून मी माझ्या कंपनी कडे निघालो. आणि त्यांना सांगितले कि, उद्या तुम्हां दोघांना माझ्याकडून गिफ्ट मिळणार आहे. माझा हा लेख त्या दोघांसाठी कौतुकाची एक थाप म्हणून भेट.
लेखन- श्री. सनी चंद्रकांत कुंभार.
मुख्यसंपादक