प्रत्येक माणूस नातेवाईकांकडे संपत्ती किती आहे आणि आपल्याला त्यांचा काय फायदा होऊ शकतो यातवच दृष्टीकोनातून विचार करू लागला. आजकाल नाती ही फक्त नावापुरती राहीलेली. प्रत्येकाला गर्व अहंकार चिकटला आहे मी का लहान होऊ.मी का स्वता त्याला बोलु या अशा संबंध फालतु पणाने नात्यांमध्ये सुरूंग लागताना दिसत आहेत. सन्मान हा वेळेचा आणि पैशाचा होत असतो व्यक्तीचा कधीच नाही. आणि व्यक्ती ह्या भ्रमात असतो कि सन्मान माझाच होतेय. उद्या ह्या पैशाने प्रवाह बदलला की सन्मान दुसऱ्या बाजूला जात असतो. कोणतीही गोष्ट कायम नसते. तुमचा वाईट काळ सुध्दा… निसर्ग हि खुप मोठी आणि ताकदवान गोष्ट आहे आपण निसर्गाच्या पुढे पालापाचोळा आहोत. एका ताटात बसून जेवणारे नातेसंबंध पैसा आल्यावर रक्तातील नातीगोती विसरून जातात.. हे कोठेतरी थांबलं पाहिजे जीवन एक आणि एकच आहे याला परत वन्स मोअर नाही..प्रत्येकांने जीवनाचा आनंद घ्या. कोण पाठीमागे राहीला असालं तर त्यांची ताकद बना. त्याला योग्य दिशा द्या.. फक्त लांबून सल्ला देऊ नका.नात्यांमध्ये गर्व अहंकाराला अजिबात थारा देऊ नका.. एकमेकांना विरोध करण्यात आयुष्यातील मौल्यवान वेळ वाया घालवू नका.. शेवटच्या क्षणी जीवनात पाठीमागे वळून बघीतलं तर आपल्यावर पश्चातापाची वेळ येऊ नये अशा पध्दतीने जीवन जगा. अभासी जगातून बाहेर या जीवन खुप सुंदर आणि खूप लहान आहे बघता बघता आयुष्य संपून जाते..
लेखक-
रमेश पवार(पंढरपूर)
मुख्यसंपादक