आठवण

सुकलेलं पान आज पुन्हा हिरव झालं
आठवणींनी आज पुन्हा हृदयात कल्लोळ माजवलं

बरसणाऱ्या सरीने मन आज हळूवार मोहरलं
कित्येक साठवलेल्या आठवणींना जणू पूरच आलं
भातुकलीच्या खेळातलं छोटासा संसारही आठवलं
उन्हाचा तडाखा आणि मायेच्या स्पर्शाने मन सुखावलं

सुकलेलं पान . . . .

शाळेतल्या त्या कट्ट्यावरच्या गप्पांनी ओठांवर हसू आणलं
इतिहासाच्या तासाला नकळत लागलेला डोळा आठवलं
भांडणाचा रुसवा फुगवण्याचा आनंदाचा काळ अगदीच डोळ्यासमोर आलं
काळजात काहूर आणि डोळ्यात पाणी तरळलं

सुकलेलं पान . . . .

वडिलांचे ओरडणे आईचे मग प्रेमाने थोपटणं
घरात नुसतेच चिमणीसारखा दिवसभर चिवचिवणं
टीव्हीसमोर रिमोट साठी भावासोबत भांडणं
रोजच रात्री चंद्र चांदण्या सोबत गप्पा मारणं

सुकलेलं पान . . . .

ऐन कामाच्या वेळीच अभ्यासाचं पुस्तक हातात पकडणं
पुस्तक हातातच पकडून मग झोपीही जाणं
परीक्षेचे रात्री मात्र जागूनच अभ्यास करणं
बाबांची परी म्हणून घरभर मिरवणं

सुकलेलं पान . . . . .

आनंदाचा कुठे काय मोजमापच नव्हतं
चुकांचा सतत पाढाही वाचला जात नव्हतं
प्रेमाचा झरा ओसंडत होत दु खाचं सावटही नव्हतं
आठवणींचं हे काळ कधीच विसरणं शक्य नव्हतं

सुकलेलं पान आज पुन्हा हिरव झालं
आठवणीने आज पुन्हा हृदयात कल्लोळ माजवलं

कवयित्री – नेहा नितीन संखे
( बोईसर )

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular