Homeमुक्त- व्यासपीठआठवत राहील आजचा दिवस, यापुढे अनेक वेळा

आठवत राहील आजचा दिवस, यापुढे अनेक वेळा

खूप वर्षांनी म्हणजे जवळपास सोळा वर्षांनी गेट टुगेदरच्या निमित्ताने सर्व मित्रांना आज एकत्र भेटता आले.

आजच्या गेट टुगेदरबद्दल लिहायचं तर, सुरवात किरण कांबळे उर्फ KK पासूनच सुरुवात करायला हवी. आपल्या किरणचा पहिल्यापासूनच जनसंपर्क दांडगा आणि सर्वाना हवाहवासा वाटणारा.
किरणने गेट टुगेदर ची संकल्पना मांडली.
ठरलेल्या गोष्टी शेअर केल्या तारीख व ठिकाणाबद्दल सर्वांची मते घेण्यात आली. त्यानुसार नियोजन आणि तयारीही केली. किरणने GT ची फोन करून मला माहिती दिली आणि माझ्या मनाने उचल खाल्ली. कामातून सुट्टी मिळत नसतानाही सर्व मित्रांना भेटायला मिळणार या भावनेतून रात्री बेरात्री जागरण व प्रवास करून गावी पोहचलो.

सकाळी सकाळीच KK चा फोन आला,” तुला नेमकं ठिकाण माहीत नसणार आहे. त्यामुळं मी आणि महेश सावंत विट्यातून येतोय. तू ठरलेल्या वेळेत गावातच थांब. मी तुला पिक-अप करतो. खूप वेळ वाट बघितल्यानंतर मी किरणला फोन केला. तर त्यानं सांगितलं, की विसरतेपणी आम्ही पुढे गेलोय. आता कसं करावं म्हणून मी तिथंच थांबलो. थोड्याच वेळात फोर व्हीलर गाडी वळवून किरण माघारी आला. मला घेतले आणि आमचा प्रवास गेट टुगेदर च्या ठिकाणाकडे जाण्यासाठी सुरु झाला.

KK गाडीत एक लिटरच्या पाण्याच्या पाच-सहा बाटल्या आणि पत्रावळी, द्रोणचा गठ्ठा घेऊन आला होता. आम्हाला जिथं पोहचायचं होतं ते ठिकाण KK नेही पाहिलं नव्हतं. तरी आम्ही रास्ता चुकलोच.. त्यामुळे अमरापूर आसपासच्या परिसरातील साधारण चार पाच किलोमीटरचा निर्सगाच्या सान्निध्यातला प्रवास घडला. त्यात योग्य ठिकाणी पोहचण्यासाठी फोनवरून विजयचा सुचनावजा डोस वरचेवर मिळतच होता. त्यामुळे विजयचे संभाषण ऐकून मी व महेश किरणची खेचत होतो. मजा घेत होतो.
शेवटी मी what’s up वरून गुगल मॅप लोकेशन शेअर करायला सांगितले व त्याआधारे योग्य त्या ठिकाणी जास्त वेळ न दवडता पोहचता आले. कसेबसे शेतातल्या कच्च्या रस्त्यावरून प्रवास करत आम्ही एकदाचे पोहचलो.
ते ठिकाण म्हणजे दशरथ वाघमोडे याच्या शेतातील शेड. ते ठिकाण खूपच आडरानात होते. नवीन माणसाला सहजासहजी सापडणारच नाही, असे होते. तरीही एकंदरीत त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रवास खूपच आनंददायी व रंजक होता.

http://linkmarathi.com/शाळा-सुरू-झाली-अन्-मुलांच/

तिथे पोचलो आणि अवाकं च झालो, कारण आम्हाला त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी किती भरकटायला लागलं होतं, हे मी पाहिलं होतं, पण इतर सहाजण आमच्या अगोदरच तिथं पोहोचले होते. तेही न भरकटता.
मी लांबूनच आवाज देत तिथं पोहोचलो. सर्वांशी गळाभेट व हस्तांदोलनातून सगळ्यांत कधी मिसळून गेलो, समजलेच नाही. विशेष म्हणजे सर्वजण पंधरा सोळा वर्षांनी भेटत होतो, पण तरीही जशी पंधरा सोळा वर्षांपूर्वी बोलण्यात, चेष्टा मस्करी करण्यात जी मज्जा येत होती, त्यात तसूभरही कमी झाली नव्हती. उलट पुर्वीपेक्षा सर्वच मला धिटपणे बोलताना, वागताना, चेष्टा मस्करी करताना जाणवत होते. गप्पांमध्ये हशा, प्रेमाने दिलेल्या शिव्या, टाळ्या सर्व गोष्टींमुळे. सर्वांच्या डोळ्यांतून आनंदी भाव ओसंडून वाहत होता. तो भाव म्हणजे भावनिक शिदोरी होती. पुढच्या अनंत काळासाठी जगण्याची उमेद देणारी होती. जगण्याचा नवा अर्थ शोधून देणारा होती.
सर्वांशी मनसोक्त गप्पा मारल्या. कोण सध्या काय करतोय ते कळले.
यादरम्यान दशरथ हा आजच्या गेट टुगेदरच्या पार्टीचा रथ एकहाती चालवत होता. म्हणजे आजच्या दिवसात आम्ही सर्व जण गप्पा मारण्यात गर्क होतो, पण दशरथ हा जेवन बनवण्यासाठी व इतर सर्व कामासाठी सुरूवातीपासून शेवटपर्यंत झटत होता. जबाबदारीच्या कामातून बिल्कुल उसंत न घेता तो आपलं कर्तव्य पार पाडत होता. मला शेवटी शेवटी त्याची किव यायला लागली. आपण सर्वजण आपुलकीची भावना दृढ करण्याच्या दृष्टीने गप्पा मारत बसलो होतो, पण दशरथ मात्र कामात ढिलाई न करता सर्व कामांची जबाबदारी घेऊन आमच्याशी संवाद साधत होता. त्यालाही निवांतपणा मिळावा असं मला मनोमन वाटत होतं, मी तसं बोललो सुद्धा, पण तो, “तुम्ही निवांत बसा, बाकी मी आहे सगळं करायला, तुम्हाला काय कमी पडलं तर मला सांगा”, असा बोलत होता.
खरंच दशरथ, मित्रा तुझ्या आजच्या समर्पणाच्या भावनेला मनापासून सॅल्युट…

आजचं जेवण दशरथने बनवलं होतं. आजच्या गेट टुगेदरच्या पार्टीचा बेत नॉनव्हेज जेवणाचा असणार, हे अगोदरच गृहीत धरून असल्यामुळे मी व उमेश सुर्यवंशी (महाराज, बुवा) आम्ही दोघं माळकरी. त्यामुळे आम्ही घरातून जेवण करूनच निघालो होतो. पण मी नको नको म्हणत असतानाही किरण व आमिर यांनी लगोलग गाडीला किक मारली आणि आमच्या दोघांसाठी शिवणी फाट्यावरून स्पेशल काजू करी, पनिर करी, राईस घेऊन आले. तसंही या सर्वांच्या भेटीने, आपुलकीने माझं मन आणि पोट केव्हाच भरलेले होते.
जेवण करतानाही गप्पा, हास्य विनोद, चर्चेला उधान आलं होतं.

उमेश सुर्यवंशी, व्यवसायातील बारकावे व वेळेचं महत्त्व यावर मत व्यक्त करत होता.
संदिप शिंदे, कठीण प्रसंगातूनही कसा मार्ग काढायचा यावर मार्गदर्शन करत होता.
किरण पाटील, आमच्या सर्वांची आपुलकीने विचारपूस करून आपण सदैव सोबत आहोत, हे पटवून देत होता.
आमिर मुलाणी, बोलता बोलता, ‘दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं, पण या दोन्ही गोष्टींतला फरक अनुभवानेच ओळखता येतो, यावर तत्वज्ञानपर गोष्ट सांगून गेला.
दशरथ वाघमोडे, याने सातत्याने प्रयत्न करत राहिल्यास मुरमाड जमिनीतही ओलावा निर्माण करता येतो, चांगल्या कर्माचं फळ आज ना उद्या नक्की मिळतं, हे स्वतःच्या अनुभवातून सांगितले.
महेश सावंतने, महिला व बालकल्याण खात्यात काम करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी भावनिक रित्या व व्यावसायिक रित्या पार पाडव्या लागतात यातील फरक अनुभवाने सांगितला.


किरण कांबळे, याने अयशस्वी झाल्यानंतर समाज जगू देत नाही, त्यावेळी पहिलं काम असतं ते स्वतःला खंबीर धीर देण्याचा. त्यातून मार्ग काढाण्याचा. साध्य करत रहा. सिद्ध करावं लागणार नाही, ते आपोआपच होत राहिलं, या अनुषंगाने लाखमोलाच्या‌ कटू गोड अनुभव, आठवणी सांगितल्या.
विजय जाधवने, कोणत्याही कामात सातत्य किती महत्त्वाचं असतं, हे एका उदाहरणावरून लक्षात आणून दिले.
मी (सुभाष मंडले) सर्वांच्या डोळ्यांतील भावनेला टिकून घेत होतो. कवी लेखक म्हंटले, की लोक दूर पळतात, त्यामुळे मी माझी ओळख लेखक म्हणून कधीच न करता वाचक म्हणून करतो, पण सर्वांनी माझ्या लिखाणावर चर्चा केली आणि आजच्या गेट टुगेदर या विषयावर लिहिण्याचा आग्रह केला.
सर्वांच्या आपुलकीतून माझ्या कुवतीप्रमाणे मी हे लिहण्याचा प्रयत्न केला आहे.
शेवटी,
जेवणं उरकली आणि सर्वांनी एक एक करून कधीही न संपणारी गोष्ट, ती म्हणजे,
‘ ती सध्या काय करते’,
या विषयावर बोलायला सुरुवात केली. काही मित्रांनी आपण जीवनसाथी म्हणून त्यावेळचा अपेक्षित जोडीदार मिळवू शकलो नाही, याची खंतही अप्रत्यक्ष बोलून दाखवली. सर्वांच्या बोलण्याचा एकंदरीत अर्थ हा होता, की ते वय निर्भिडपणे भावना व्यक्त करण्याचं वय नव्हते आणि कर्तृत्व सिद्ध केल्याशिवाय या गोष्टी साध्य करता येत नसतात आणि कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर त्या गोष्टींना खूप वेळ झालेला असतो.
शेवटी ती काय व तो काय. आपण सर्वजण सुखी संसाराचा गाडा सुरळीत चालवत आहेत, यातच समाधानी आहे. सर्वांनी या विषयावर निर्भेळ व निष्कपट भावना व्यक्त केल्या.
फोटो सेशन करताना उमेश सुर्यवंशी याने ज्या शाळा कॉलेज मुळे आज आपण इतक्या वर्षांनंतरही मित्र या नात्याने भेटलो, मन मोकळे केले, त्या कॉलेजचे ऋण न फेडण्यासारखे आहे, हे लक्षात आणून दिले, म्हणून एक फोटो त्या कॉलेजच्या इमारतीकडे कृतज्ञतापूर्वक पाहतानाचा आहे.

सुरवातीपासूनच्या जबाबदारीतून दशरथ मुक्त न होता, घरातून आणलेली भांडी, ताटं यांची आवराआवर करून टु व्हिलर व फोर व्हीलर गाड्या लावलेल्या होत्या, त्या ठिकाणी घेऊन निघू लागला. त्याला सगळ्यांनी शेवटी आवराआवर करायला व भांडी गाड्यांपर्यंत घेऊन जाण्यास मदत केली.

आपला व्हाट्सअँप ग्रुप हा फक्त कॉलेज मेट्सचा ग्रुप नाही, येथे मैत्री ही एक भावना आहे, आताच्या पिढीत जरी आपण नोकरी, व्यावसायिकरित्या कष्ट करून स्वावलंबी झालो असलो, तरी जुने मित्र व तेव्हाच्या आठवणी यात आपल्या पिढीची एक घट्ट वीण आहे.
अलिकडेच माझ्या असे वाचण्यात आले आहे, कि सात वर्ष जी मैत्री टिकते, ती जन्मात कधीच तुटत नाही.
आपले काही मित्र भौतिक दृष्ट्या दुर असल्याने आज भेटू शकले नाहीत, पण मनाने आपण अतूट मैत्री टिकवून आहोत. मनाने भेटत आहोत.

http://linkmarathi.com/abacus-म्हणजे-काय-सर्व-माहिती-ए/


चार तास कधी संपले समजलेच नाही. मित्रांचा सहवास संपूच नये असे वाटत होते, पण भौतिक जगात प्रवेश करावाच लागतो, त्यामुळे आपण यापुढे ह्यापेक्षाही नव्या जोमाने गेट टुगेदरला नक्की भेटण्याचे वचन देऊन आम्ही तिथून निघालो.
माझ्या या सगळ्या मित्रांचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि साथ यांनी आजचं हे गेट टुगेदर अविस्मरणीय केलं.

_सुभाष आनंदा मंडले.

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. नमस्कार –
    सुभाष सर- खूप छान उपक्रम आपण सर्व मित्र मंडळींनी आयोजित केला. आजच्या तारीखला प्रत्येकाच्या हातात सतत मोबाईल नावाची वस्तू असते, त्यावरूनच एक फोन केला की सगळ्यांची चौकशी, विचारपूस अगदी घरात बसून केली जाते. का ? तर कोणाला वेळ नाही, एकमेकांना भेटायला, एकमेकांसाठी कोणाकडेच वेळ नसतो.

    आज आपले शब्द वाचले आणि मी सरळ जाऊन पोचलो माझ्याच बालपणात. कितीतरी गोष्टी मित्रांच्या संगतीत राहून केलेल्या असतात. सगळ्यांना आवाज देत एकत्र करून कुठेतरी फिरायला जाणे होई, कोण नसेल आला तर त्याला घरातून जसा आहे तसा त्याला उचलून आणले जाई. काही अडचण असेल कोणाला तर त्यालाच हणून तू सांगितलं का नाहीस, आम्ही आहोत ना !! असा दम भरला जाई…
    काय दिवस होते ते- कसलाही डोक्यावर ताण नाही, फक्त नि फक्त फिरायचं, हिंदडायचं, खायला घरी यायचं आणि आई-वडिलांचा डोळा चुकवून पुन्हा घरातून नाहीसे व्हायचं ते अगदी काळोख पडल्यावर घरी यायचं.
    असे दिवस असायचे…

    आज आपल्या लिखाणाने या सर्व गोष्टी आठवल्या, बालपणाच्या, शाळेच्या, कॉलेजच्या कट्ट्यावर बसून केलेल्या गप्पागोष्टी…
    आपण म्हणालात तसं, शिव्या नसतील तर त्या मैत्रीत त्यावेळी मैत्रीत्वच नाही असंच समजून आम्ही वागायचे आणि समोर येईल त्याला, त्यालाही कळणार नाही अशा भाषेत शिवी हानायची…
    पार गोंधळून जायचा समोरचा….

    असे हे दिवस आठवले की अंगात लहान मुलंच शिरलाय की काय असे वाटू लागते..
    सुभाष सर – आपले खूप खूप धन्यवाद…
    आणि असेच आपण सर्व मित्रवर्ग एकत्र सुखी, आनंदी राहा, भेटत राहा….

    धन्यवाद…!!

  2. जग भावनांवर चालतं, नियमांवर नाही, भावनेत वाहत जाणं आणि भावनेत प्रवाहीत होणं यात फरक लक्षात आला म्हणजे जीवन सुखकर होईल.
    धन्यवाद, friends, link Marathi & team🙏🙏🙏

- Advertisment -spot_img

Most Popular