Homeमुक्त- व्यासपीठआणि ती म्हणते प्रेम मी कधी केलेच नाही

आणि ती म्हणते प्रेम मी कधी केलेच नाही

बाईक वरून दुर -दुर फिरणे
व्हॅलेनटाईन डे साजरा करणे
तिला लाडाने जवळ घेणे
उगाचच अतिशोयॊक्ती बोलणे
मला कधी जमलेच नाही ,
आणि ती म्हणते मी प्रेम कधी केलेच नाही 1

सतत तिच्य पुढे-मागे करणे
तिच्या होकारांना होकार देणे
तिच्या एक झलकेसाठी तासनंतास वाट पाहणे
तिला भेटण्याचे नवं-नवे बहाणे शोधणे
मला कधी जमलेच नाही ,
आणि ती म्हणते प्रेम मी कधी केलेच नाही

रोज – रोज तिची स्तुती करणे
तिच्यासाठी वेळ देणे
ती माझ्यासाठी किती खास आहे हे तिला सांगणे
मला कधी जमले नाही ,
आणि ती म्हणते प्रेम मी कधी कलेच नाही . -3-

     - अमित अशोक गुरव (आजरा जि- कोल्हापूर )
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

3 COMMENTS

- Advertisment -spot_img

Most Popular