Homeवैशिष्ट्येकान्होजी राजे आंग्रे यांचे नाव गुगल सर्च केल्यावर 'pirate' समुद्री डाकू म्हणून...

कान्होजी राजे आंग्रे यांचे नाव गुगल सर्च केल्यावर ‘pirate’ समुद्री डाकू म्हणून येत आहे ; कोण आहेत कान्होजी राजे आंग्रे

काल, ट्विटर वर कोणीतरी पोस्ट केलं होतं की सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांचे नाव गुगल सर्च केल्यावर ‘pirate’ समुद्री डाकू म्हणून येत आहे, याची शहानिशा करून घ्यावी म्हणून मी सुद्धा सर्च केलं आणि खरंच गुगल वर दुर्दैवाने सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या नावाच्या description झाली pirate लिहिलेले होते.

मुळात, या गोष्टीवर आक्षेप का घ्यावा याचं संक्षिप्त रुपात उत्तर देतो. ज्या वेळेला पोर्तुगीज, ब्रिटीश, डच आणि इतर काही परकीय हल्लेखोर भारताच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या ठिकाणांवर हल्ला करीत होते, लुटत होते, तेव्हा कान्होजी राज्यांनी त्यांना चांगला ‘सडकवून’ काढला होता.

कान्होजी राज्यांच्या भयामुळे अनेक हल्लेखोर त्यांच्या भागात यायचा विचार सुद्धा करत नव्हते ! कान्होजींच्या शौर्याच्या कथा खूप आहेत. कालांतराने, 1951 साली मराठा नौदलाचे ‘admiral’ कान्होजी राजे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘INS ANGRE’ या नावाने एका ‘stone frigate’ ला नाव देण्यात आले.

कान्होजी राज्यांचे योगदान अतुलनीय आहे ! पण दुर्भाग्य बघा, इतक्या शूर वीर नौका नायकाला ‘pirate’ म्हणून संबोधले गेले आहे ! ही गोष्ट वेळीच सुधारणे गरजेचे आहे. या करिता आपण एक काम करू शकतो.

  1. गुगल वर जाऊन ‘कान्होजी आंग्रे’ सर्च करा !
  2. नावा पुढे दिसणारे तीन डॉट वर क्लीक करून ‘send feedback’ वर क्लिक करा !
  3. नवीन window open झाल्यावर तिथे ‘inappropriate’ वर क्लिक करून ‘फीडबॅक’ मध्ये ‘Maratha Navy Admiral’
    असे लिहून सेंड करा !

जास्ती जास्त संख्येने ही गोष्ट करा ! आणि लोकांना देखील असे करण्यासाठी आव्हान करा !

असा msg सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तरुणांनी समुद्री लुटारू या शब्दाला कडाडून विरोध केला आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular