https://www.facebook.com/114377503760034/posts/182784030252714
कोल्हापुर (अमित गुरव ) -: हो पाळणा गायला आणि एक आजोबा प्रचंड व्हायरल झाले आहेत. मात्र त्यात आजरा, गडहिंग्लज ,चंदगड तालुक्यातील काही गावाच्या नावाचा उल्लेख आढळतो. त्यांची रचना आणि ठब पाहून सद्या ३० शी च्या पुठे असलेल्या सर्व लोकांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
चाळू कृष्णा गिलबिले (रा. लाकूडवाडी वय ७०) हे आजरा तालुक्यातील आजोबा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. त्यात त्यांनी गावांची महती तसेच गावातल्या व्यक्तीची महती वजा वैशिष्टये सांगितली आहेत.
दृष्टीहीन असले तरी त्यांची समाजाकडे पाहण्याची दृष्टी वाखण्यासारखी आहे. ते गावात भाजीपाला विकतात त्यांना स्पर्शज्ञान चांगले असल्याचे सरपंच शंकर कुराडे यांनी सांगितले. विनापादत्राने ते संपुर्ण गाव फिरतात. तसेच एकदा एकादे गाणे किंवा भजन ऐकले तर ते लक्षात ठेवतात. यावरून त्यांची स्मरणशक्ती किती जबरदस्त आहे हे समजते. कदाचित याच कारणास्तव तो व्हिडीओ खूप जास्त लोकांनी पाहिला पण त्यांची जवळून ओळख कोल्हापूर वासीयांना करून देण्याचा प्रयत्न लिंक मराठी तुन केला आहे.
खालील लिंक वर क्लिक करून व्हिडीओ पहावा..
https://www.facebook.com/114377503760034/posts/182784030252714/

मुख्यसंपादक
खुप खुप शुभेच्छा आजोबांचा अनुभव आणि त्यांनी रचलेले पाळणा याची काहीही जोड नाही त्यामुळे त्यांना मनापासून सलाम