आयुष्य हे साडेतीन अक्षरांचा शब्द परंतु; जगताना खूप चांगल्या व वाईट प्रसंगातून जावं लागतं.जो जन्माला आला तो मरणार हे नक्कीच.मग मरणाची भीती कशाला,हे जरी सर्वांना माहित असले तरी सुद्धा मरणाची तलवार कोरोना रोगाच्या रूपाने येईल हे अपेक्षित नव्हतंच.. २०१९-२० मध्ये आलेल्या कोरोना नावाच्या महामारी ने सुरळीत चालू असणाऱ्या धावपळीच्या युगाला कुठेतरी विराम दिलाच.
खूप कमी वेळेत पूर्ण देशासोबत परदेश देखील हादरवून टाकणारा कोरोना रोग सर्वांच्याच आठवणीत राहिल.झपाट्याने वाढत चाललेल्या कोरोनाबाधित रूग्णांची संख्या तसेच मृत्यू पाहून जनता घाबरून गेली परिणामी केलेला लाॅकडाउन. जे आधी कधी असे झाले नव्हते ते घडतं गेले, लाॅकडाउन झाल्यामुळे आर्थिकदृष्ट्या लोक हतबल झाली सगळीकडे मृत्यूचा तांडव चालू होता स्वतःचा जीव वाचविण्यासाठी गावाकडे धाव घेतली कित्येक गावकरी लोकांनी पाठ फिरवली परंतु काहिंनी उत्तम प्रकारे व्यवस्था केली.
२०२० हे वर्षेच जेवढं धोकादायक होते तेवढंच शिकवण देणारं सुद्धा होते. ‘कोरोना’ हा रोग नाही कोणी पाहिला,परंतु त्याच नाव घेताच आपल्याला परका आणि परक्यामधील आपला माणूस समजू शकला. स्वच्छतेची गरज काय हे देखील पटवून दिले.
माणुसकीची खरी ओळख पटली. अडचणीच्या काळात किती मदतीचे हात पूढे आले ते समजले.लाखो लोकांचे जीव गेले डाॅक्टर देखील हतबल झाले जन्म ,मृत्यू मानवाच्या हाती नसतं पण अचानक आलेल्या कोरोनाच्या मारामारीने सर्वांचे डोळे उघडले पृथ्वीवर आपण फक्त पाहुणे आहोत तरीपण हक्क गाजवायला बघतो.मानवनिर्मित धावपळीच्या युगात निसर्ग खूप काही बदलून दाखवू शकतो.हे २०२० मध्ये पटवून दिले.’कोरोना’,वादळी वारा,परतीचा पाऊस अशी अनेक संकट येवून नुकसान करून गेलेत कोरोनाचं हेच वर्ष धोकादायक आहे हे संपलं की झालं हा विचार सोडून द्या,’कोरोना हे फक्त निमित्त आहे या नंतरचा प्रत्तेक दिवस काळजीपूर्वक जगायला भाग पाडेल. निसर्गाला सांभाळा, निसर्ग तुम्हाला सांभाळेल. या संकटांवर मात करुन जीवन जगले पाहिजे.
2020 मध्ये आलेल्या संकटाच्या महामारीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे , पाया पुन्हा उभारण्यासाठी प्रत्येकाने कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे. काळजीपुर्वक जगणं हितकारक ठरेल.
2020 हे वर्ष कोरोना आयुष्य या पुस्तकातील असा धडा होता ज्यामुळे आव्हानांचा सामना करून पुन्हा नव्याने उभारी घेण्याचं बळ दिले आहे , सज्ज केले आहे. पर्यावरणाचे रक्षण करा, स्वच्छता राखा. मरणं जरी आपल्या हातात नसले तरीही जगणं मात्र आपल्या हातात आहे….
- विशाखा चंद्रकांत आगरे ( दापोली , पांगारी )
मुख्यसंपादक
खूप छान लेखन
Khup chaan vichar ahet aple Ani लेखन पन