Homeवैशिष्ट्येगणपती ला दुर्वा का वाहतात ?

गणपती ला दुर्वा का वाहतात ?

एकेकाळी मायावी शक्तीपासून अनलासुर नावाचा भयानक असुर उत्पन्न झाला ; त्यांच्या कानठल्या बसवणार्या आवाजाने पृथ्वीचा थरकाप उडत होता. त्यांच्या लालबुंद डोळे व अग्नीच्या ज्वाला निघत होत्या . त्यामुळे जवळपास ही कोणी फिरत नव्हते . सर्व देव ही त्याच्या भीतीने भयभीत झाले .
अंतिम क्षणी सर्व देव श्री गणपतीच्या शरण गेले. आणि त्यांचा धावा घेताच गणपती बालरूपात प्रकट झाले. आणि त्यांनी अनलासुर पासून सर्वाना भयमुक्त करण्याचे वचन दिले.
अनलासुरा विरुद्ध युद्ध पुकारल्यावर बालरूपी गणपती ला राक्षसाने गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला पण तात्काळ विराट रूप धारण करण्याऱ्या गणपतीने राक्षसालाच गिळंकृत केले . त्यामुळे राक्षचाचा अंत झालाच पण गणपती बाप्पाच्या अंगाची लाही लाही होऊ लागली . हा त्रास सहन होत नसल्याने गणपती बाप्पा लोळू लागले.
उपाय म्हणून सर्वांगाला चंदनाचा लेप लावला , देवांनी त्यांच्या डोक्यावर चंद्राची स्थापणा केल्याने गणपतीला भालचंद्र नाव पडले. विष्णूने आपल्या हातातील कमळ दिले तेव्हा पद्मपाणी नाव मिळाले , शंकरानी आपल्या गळ्यातील नाग गणपतीच्या कमरेभोवती बांधला , वरूनाने गणपतीच्या सर्वांगावर पाण्याचा अभिषेक केला तरी अंगाची कायली कमी होत न्हवती.
तेवढयात काही ऋषीमुनी तिथे आले . प्रत्येकाने 21 दुर्वाची जुडी गणपतीच्या मस्तकावर ठेवली आणि तात्काळ आग थांबली .
त्यावेळेस श्री गणेश आनंदून गेले आणि इतके प्रयत्न करून माझ्या अंगाची लाही कमी होत न्हवती पण दुर्वा मुळे ती कमी झाली त्यामुळे यापुठे जो कोणी मला भक्तिभावाने दुर्वा अर्पण करेल त्याला हजारो यज्ञयाग , व्रत , आणि तीर्थयात्रा केल्याचं पुण्य लाभेल असा अभय दिला.
यासाठीच गणपतीला 21 दुर्वा ची जुडी वाहतात किंवा वाहावीत .

संकलन – अमित गुरव

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

2 COMMENTS

- Advertisment -spot_img

Most Popular