गणपती बाप्पा ला मोदक का आवडतात ?
गणपतीची पूजा आणि मोदक नाही असे होणारच नाही त्यामुळे गणपती बाप्पा आणि मोदक हे समीकरण असतेच .. काजू मोदक , उकडीचे मोदक , माव्याचे मोदक , लाल गव्हाचे मोदक , मोतीचुर मोदक , तसेच आता चॉकलेट मोदक अश्या वेगवेगळ्या प्रकारचे मोदकांचा नेवैद्य गणपती बाप्पा साठी तयार केला जातो; पण या सगळ्यात तुम्हाला कधी बाप्पा ला मोदक का आवडतो हा प्रश्न उपस्थित झाला आहे का? असेल तर चिंता करू नका आम्ही तुमच्यासाठी त्याची कारणे घेऊन आलो आहोत…
पहिले कारण -: लोकप्रिय आख्यायिकेनुसार , एकदा भगवान शिव झोपले होते आणि श्री गणेश दरवाजावर पहारा देत होते तेव्हा परशुरामाला त्यांनी अडवले . 14 विद्या आणि 64 कला चा अधिपती असलेल्या गणेशाशी परशुरामाने युद्ध पुकारले आणि या युद्धात श्री गणेशाचा दात तुटला . त्यानंतर गणेशाला अन्न चावण्यास त्रास होत होता. मग त्यांच्यासाठी मऊ असे मोदक केले ज्यामुळे चावण्याची गरज पडत नव्हती . भूक लागली तेव्हा त्यांनी मोदक खाल्ले आणि आपली भूक भागवली त्यावेळे पासून श्री गणेशा ना मोदक खूप आवडीचा पदार्थ बनला.
दुसरे कारण -: ही कथा गणपती बाप्पा आणि आई अनुसया यांच्याशी संबंधित आहे. एकेदिवशी गणपती बाप्पा , पार्वती देवी भगवान शंकर यांच्यासह अनुसया यांच्या घरी गेले असताना आई अनुसया यांनी विचार केला की गणपतीला जेवण द्यावे पण त्यांची भूक संपतच न्हवती मग अनुसायाने विचार केला की काहीतरी गोड खाऊ घालते म्हणजे कदाचित पोट भरेल. त्याप्रमाणे त्यांना मोदक खायला दिले तर लगेच त्यांनी तृप्तीचा ठेकर दिला.
तिसरे कारण -: असे मानले जाते की गणपतीला 21 मोदक नेवेद्य म्हणून दिले की त्यांच्यासोबतच इतर देवदेवतांचे पोट देखील भरते . त्यामुळेच नेवद्य मध्ये गणपतीला मोदक अर्पण करतात.
चौथे कारण -: मोद म्हणजे आनंद देणारे , मोदक खाल्याने मन प्रसन्न व आनंदी होते . शास्त्रानुसार श्री गणेश हे नेहमी आनंदी राहणारे देव आहेत. ते भक्ताचे दुःख दूर करून त्यांना आनंद देतात म्हणून तर त्यांना विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते.
पाचवे कारण -: मोदक हे अमृतापासून बनवल्याचे सांगितले जाते. देवतांनी पार्वतीला दिव्य मोदक दिले. ज्यावेळी श्री गणेशना मोदकाबाबत समजले तेव्हा ते खाण्याची इच्छा वाटली ते मिळाले तेव्हापासून मोदक बाप्पाला खूप प्रिय आहेत.
http://linkmarathi.com/wp-admin/post.php?post=5934&action=edit
मुख्यसंपादक
[…] गणपती बाप्पा ला मोदक का आवडतात ? अमित गुरव […]
[…] गणपती बाप्पा ला मोदक का आवडतात ? अमित गुरव […]
[…] गणपती बाप्पा ला मोदक का आवडतात ? अमित गुरव […]
[…] गणपती बाप्पा ला मोदक का आवडतात ? अमित गुरव […]
[…] गणपती बाप्पा ला मोदक का आवडतात ? अमित गुरव […]