Homeमुक्त- व्यासपीठ" गावाकडची दिवाळी "

” गावाकडची दिवाळी “

ह्या वर्षीची दिवाळी गावी साजरी झाली…. आणि आपल्या रूढी, परंपरांना पुन्हा एकदा उजळणी मिळाली !

मोठमोठ्या शहरांत साजर्‍या होणार्‍या दिवाळीत रोषणाई असते…. फटाक्यांचे मोठाले आवाज असतात….कधी घरी बनवलेला तर कधी विकत आणलेला फराळ असतो…. गॅलरीत लावलेले कंदिल असतात…. पॅसेजमध्ये काढलेल्या सुंदर रांगोळ्या असतात… कधी पणत्या तर कधी पणतीच्या साच्यातिल मेणबत्याही असतात !!

http://linkmarathi.com/ओवाळणी-2/

पण गावाकडची दिवाळी अणुभवलेल्या माणसाला या सार्‍यांचं फारसं आकर्षण वाटत नाही

गावाकडची दिवाळी म्हणजे पहाटे उठून गवळण्या घालण्यासाठी आईनं केलेली लगबग…. “ह्या वर्षी जास्त काही करणार नाही” म्हणत रात्र रात्र जागुन केलेला प्रत्येक फराळाचा पदार्थ…. दारात लावण्यासाठी छोटा आकाशकंदील…. घरात सर्वांनाच नाही पण किमान लहानग्यांना घेतलेले नविन कपडे…. शेणाने बणवलेला वाडा आणि वाड्यात जाणारी ती लक्ष्मीची पावले…. लायटींग नसली तरी पणत्यांची रोषणाई…. पाडव्याला केलेल्या पोळ्या…. भाऊबिजेची ओवाळणी…. फराळाची झालेली देवाणघेवाण आणि बरंच काही !!

http://linkmarathi.com/तुम्हाला-दिवाळीत-बोनस-का/


शहरातली दिवाळी जरी लखलखित आणि पॉलिश्ड वाटत असली तरी गावाकडच्या दिवाळीने आपल्या मातीशी आणि परंपरांशी नाळ जोडली आहे यात दुमत नाही !!

  • गोपाळ शंकर संकपाळ

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303

महाराष्ट्रात लोकप्रिय होत असल्येल्या Link मराठी पोर्टल मध्ये स्वतःच्या नाव सह आपले लेख- कविता प्रकाशित करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी फॉर्म भरावा आणि आपल्या लेखन कॉपी-पेस्ट होण्याच्या चिंता दूर करावी. आमची टीम लवकरच संपर्क साधेल.

www.linkmarathi.com

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular