Homeआरोग्यचालण्याचे फायदे

चालण्याचे फायदे

1) आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता 30 टक्के कमी होते. 
2) रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची शक्यता कमी असते.
3) रोज 30 ते 40 मिनिटे पायी चालल्याने मधुमेहाचा धोका 29 टक्के कमी होतो.
4) दिवसातून 30 मिनिटे पायी चालल्याने डिप्रेशनची शक्यता 36 टक्के कमी असते.
5) रोज कमीत कमी 1 तास पायी चालल्याने जाडेपणा कमी होतो.
6) सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो.
7) हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते.
8)  चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होतो.
9) सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो.
10)  चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत
11)  चालण्यामुळे झोपही चांगली लागते.
12) मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठीही चालणे फायदेशीर ठरते.
13)  वजन कमी करायचे असल्यास हा व्यायामप्रकार उत्तम
14)  चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळते
15) चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करते.
16)  दररोज एक तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो
17)  चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, मलबद्धतेसारखे, पचनाचे विकार कमी होतात.
18)  झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढतो.
19) नियमित चालण्याची सवय असणाऱ्या मध्ये ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.
20) नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते.
21) नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.
22)  नियमित चालण्यामुळे चयापचय संस्था सुधारते. अंतस्त्रावी ग्रंथीचे कार्य सुधारते.
23)  हाडांची मजबुतीही चालण्यामुळे वाढते.
24)  नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत होतात.
25)  मोतीबिंदूची शक्यता कमी होते.
26) नियमित चालण्यामुळे काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो.
27)  नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोग.
28)  चालण्यातून नैराश्याची पातळी खाली येण्यास मदत तर होते
29)  दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते.
30)  नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.
31)  कोणत्याही वयात तुम्ही हा व्यायाम करु शकता. आपण आपल्या नव्वदीतही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल तितकेच

सौजन्य- SkyIndia

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular