सुख दुःखाचे सुरेख नाते,
माझी कविता…
प्रेमाचेही वचन पाळते,
माझी कविता…
प्राजक्तसड्यापरि मला भासते
माझी कविता…
मनात माझ्या मोरापरि ती,
नाच नाचते, माझी कविता…
अडथळ्यांच्या वाटेवरही सोबत करते, माझी कविता…
कधी कधी तर आई होवून प्रेमळ
हसते, माझी कविता…
रानोमाळ धावूनही कधी न भेटे,
माझी कविता…
तर कधी हलक्या पावलांनी येवून
बिलगते, माझी कविता…
भकास होता सारे काही,
मनात माझ्या केवळ उरते,
माझी कविता…
स्नेहा राणे-बेहेरे, ठाणे/वेंगुर्ला.
https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303
लेखक व कवींना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी लिंक मराठी हे न्यूज पोर्टल घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी .
तुमचे स्वलेख नावासह प्रसिद्ध केले जातील ; यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही.
जागतिक काव्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
मुख्यसंपादक