सकळ संतांचा शिरोमणी ,हरी अवतार ज्ञानोबा माझा,
चिरंजीव समाधीस्त श्री क्षेत्र आळंदीसी ज्ञानोबा माझा.१
छळवणूक सोसूनिया धर्ममार्तंडांची चारही भावंडांनी ,
अनुभवले पोरकेपण ,मातापितयाच्या देहत्यागानी .२
सुसंस्कार माता रूक्मिणीचे ,ज्ञानामृत मिळे विठ्ठलपंतांचे,
शास्त्र पुराण,वेदांचे ज्ञान ,असे ज्ञानेश्वर महाराजांचे.३
अमृतातेही पैजा जिंके , शब्द मधूर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे,
ज्ञानामृत अमृतानुभवाचे,हरीपाठाचे अभंग नित्यपाठाचे.४
गहिनीनाथांचा अनुग्रह,थोरले बंधू संत निवृतीनाथांशी,
निवृतीनाथांचा अनुग्रह ज्ञानदेव,सोपान मुक्ताबाईशी.५
अंगीकारूनी भूतदया,ज्ञानेशांंनी समाजमनासी जागवीले,
मार्ग विठ्ठलभक्तीचा दावूनी ज्ञानेशांनी वारकरी मेळवीले.६
लीला दावूनीया नाना पाखंड,दृष्ट विचारांसी घालवीले , नामदेव ,गोरोबा,चोखा मेळा सावता जगी धंन्य केले .७
विचार करूनीया विश्वकल्याणाचा पसायदान मागीतले,
ज्ञानेश्र्वर महाराजांच्या जयंतीशी चरणी मस्तक ठेवीले.८
संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या जयंती दिवशी माझे काव्य पूष्प
चरणांवर समर्पित.
श्री रेवाशंकर वाघ ठाणे
मुख्यसंपादक
[…] ज्ञानदेव अमित गुरव […]