अंधाऱ्या पावसाळी आज,
आठवण तिची झाली….
आडोशाला उभा होता मी,
परी पापणी ओली झाली..!!!
भिजलेल्या देहातूनी आज,
विझलेल्या आठवणी जाग्या झाल्या….
सोबत नसतानाही ती आज,
सोबती होऊन गेल्या..!!!
थेंबा- थेंबा सवे आज,
मी ही तिच्यात रमून गेलो…
तिचा नसतानाही मी आज,
तिचाच होऊन गेलो..!!!
डोहा- डोहा मध्ये आज,
प्रेमा – प्रेमाचे क्षण तुंबले…
दूर असुनही ती आज,
तिच्याच मिठीत घेऊन गेले..!!!
अवकाळी- पावसाळी आज,
धारांन सवे ती परत आली…
मनी राहुनी जन्मोजन्मी
क्षणात वाहून गेली..!!!
भिजता- भिजता आज,
पुन्हा – पुन्हा प्रेमात पडलो…
थांबता – थांबता पाऊस आज,
पुन्हा तिचाच होऊन गेलो..!!!
मुख्यसंपादक