Homeमुक्त- व्यासपीठतुला जास्त आनंद केव्हा होतो

तुला जास्त आनंद केव्हा होतो

तस तर खूप जागा, कृती आहेत आनंदाच्या. जस की फिरण, लिहणं, वाचन, पाऊस, व्यायाम, प्राणायम करणं, मित्रांसोबत चहा,गप्पा, आणि अजून बऱ्याच ठिकाणी मला खूप आनंद होतो.
आणि एक महत्वाची गोष्ट दुःख, वेदना यामध्ये आनंद म्हणण्यापेक्षा सुकून आहे. हा वेदनेत सुकून असतो. म्हणजे मला तरी तस जाणवत.
आपल्या सोबत लोक खोटं बोलतात, कधी कधी जवळच्या व्यक्तीचे काही शब्द कानातून सरळ काळजात घुसतात, त्यावेळी होणारी वेदना खूप वेदनादाई असते खर तर पण त्यात सुकून आहे समजलं तर. जेव्हा धोका मिळतो, अपेक्षाभंग होतो, लोक आपल्याला टाळतात, आपली असणारी व्यक्ती जेव्हा आपली नाही किंवा फक्त आपली नाही हे समजतं. त्यावेळी हृदयाचे होणारे तुकडे. कोणीतरी हृदयावर घाव घालत आहे. हृदयाला ही वेदना सहन होत नाही. अस जाणवायला लागत. तेव्हा कुठे आपण स्वतः मध्ये पाहतो. आपल्याला काय वाटतंय, आपल्यला काय फील होतय तेव्हा समजतं. आपण दुसरे सोडून स्वतः मध्ये पाहतो तेव्हा आपली प्रगती होते.
खूप वेदना, दुःख होत. पण हळू हळू आपण त्यातून सावरतो. वेळ त्या जखमेवर मायेने फुंकर घालते. आणि जखमा भरत जातात. आणि जे आपण सहन केलेल असत. त्याचा एक खूप मोठा अन महत्वाचा फायदा होतो. आपल्यात लढण्याची ताकद निर्माण होते. आपण मानसिक पातळीवर स्ट्रॉंग होत जातो. मला अजून खूप स्ट्रॉंग होयचंय. म्हणून मला वेदना सुकून देतात.
आणि समोरच्याला जेव्हा पश्चाताप होतो. त्यावेळी आपण नक्की चांगले आहोत याची जाणीव होते. त्याला परत स्वीकारणे अशक्य असते. त्याला त्रास झाला तरी यावेळी काही वाटत नाही. त्याला त्रास होयला पाहिजे अस अन त्याला त्रास नको होयला असही. त्याला काय वाटत याने काडीमात्र फरक पडत नाही. कारण यावेळी आपण स्वतः मध्ये, स्वतः ला काय वाटते पाहत असतो. माझ्या बाबतीत तरी असच घडत.
आणि दुःखात सुकून वाटावा याला अजून एक कारण अस की, जी गोष्ट सतत जवळ असते तिची सवय होऊन जाते. तशीच मला वेदनेची सवय होऊन गेली आहे. त्यामुळे ती मिळाली तर सुकून मिळतो.
आणि असही आयुष्यात सुख दुःख दोन्ही असावं.
रडून हसण्याची मजाच वेगळी असते.
आणि आता आनंदाचा पण जास्त आनंद होत नाही, आणि दुःखाच पण जास्त दुःख होत नाही. ओठांवर एक गोड हसू ठेवायचे फक्त. आयुष्य आहे चलायचेच.

  • आरती कापरे ( सोलापूर )
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular