Homeमुक्त- व्यासपीठत्या रात्री

त्या रात्री

अंधारमय प्रकाशाला जेव्हा
एकटाच निपजून पाहत होतो

शरद चांदण्या रात्री केवळ रेटून
काजव्यांची किर्रकिर्र ऐकत होतो

चमचमत्या शुक्राकडे टक लावून
ध्रुवतारा आकाशी शोधत होतो

वेगवान वाऱ्यासमवेत बोलत डोलत
क्षण सुखाचे निवांत अनुभवत होतो

रममाण त्या नक्षत्रांच्या तारकांसवे
स्वप्ने आभाळाएव्हढी रंगवत होतो

चंद्राच्या येणाऱ्या प्रखर तेजाकडून
खेळ आयुष्याचा नवा रचत होतो

चंद्र तारकांच्या दृष्यास अनुसरून
स्वतः व्याख्या प्रेमाची मांडत होतो

व्याख्या प्रेमाची मांडताना त्या रात्री
सतत तिचाच चेहरा आठवत होतो

कवी : नयन धारणकर, नाशिक©®

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular