◾थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे अलर्टनेस अर्थात मानवी मेंदूची जागरूकता सुधारते. तसेच थंड पाण्याने आंघोळ केल्याने हार्ट रेट वाढतो आणि श्वास घेण्याची व सोडण्याची गतीही वाढते. थंड पाण्याने चेहरा धुतल्याने व्यक्ती जास्त अलर्ट होतो.
◾ थंड पाण्याने अंघोळ केल्यास शरीराचे मेटाबॉलिज्म वाढते. मुळात शरीरावर थंड पाणी टाकल्याने शरीराचे तापमान कमी होते. अशात शरीराला गरम ठेवण्यासाठी किंवा शरीराचे तापमान योग्य ठेवण्यासाठी मेटाबॉलिज्म जास्त काम करते. याने व्यक्तीला वजन कमी करण्यातही मदत होते.
◾रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते जे लोक थंड पाण्याने आंघोळ करतात २९ टक्के कमी आजारी पडतात.
◾थंड पाण्याने आंघोळ केल्याने न्यूरोट्रान्समीटर जसे की, नॉर एपिनेफ्रीन आणि एंडॉर्फिन्स अॅक्टिव होतात.ज्यामुळे डिप्रेशनची दूर होऊ लागते. परिणामी मूड फ्रेश होतो.
◾शारीरिक थकवा शमतो
थंड पाण्याने आंघोळ केल्यास अंगदुखी दूर होते. तसेच शरीराचा थकवासुद्धा दूर होतो.
महत्वाचे:-
– थंड पाण्याने आंघोळ केल्याचे वेगवेगळे फायदे होत असले तरी थंड पाण्याने आंघोळ करण्याला मेडिकल थेरपी समजू नये. खासकरून अशा लोकांनी हे करू नये जे डॉक्टरांकडून डिप्रेशनवर उपचार घेत आहेत.
– हृदयरोग असलेल्या व्यक्तींनीदेखील थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे. कारण यावेळी हृदयाची गति वाढते. अशात हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो.
सो- Sky india
मुख्यसंपादक