गारगोटी.म्हसवे(ता. भुदरगड) येथील कु.राधिका अंबादास देसाई हीचा वाढदिवस वृक्षारोपण करून साजरा करणेत आला.कु.राधिका हीचा 21 जून या दिवशी पारंपरिक पद्धतीला फाटा देत पर्यावरणपुरक बारावा वाढदिवस साजरा केला. वर्षभर साठलेले खाऊचे पैसे आणि केक,कपडे इत्यादी खर्चाला फाटा देत जमा पैशातून नारळ व काजूची झाडे विकत घेऊन त्यांची लागवड केली.दरवर्षी देसाई कुटुंब आपल्या मूलगीचा वाढदिवस विविध उपक्रम राबवून करत आहे.गरीब मुलांना शालेय साहित्य वाटप,खाऊ वाटप,शिक्षणासाठी मुले दत्तक घेणे असे उपक्रम याआधी या कुटुंबाने केले आहेत.तिच्या आठव्या वाढदिवसाच्या निमित्ताने याआधी त्यांनी आंबा व काजू ची अनेक झाडे लावली आहेत.निसर्गाचा समतोल राखला जावा आणि मुलांना निसर्गाच्या सानिध्यात रमता यावे हा उद्देश असल्याचे राधिकाचे वडील श्री.अंबादास देसाई यांनी सांगितले.या स्तुत्य उपक्रमाचे अनेकांनी कौतुक केले आहे.
मुख्यसंपादक