Homeघडामोडीबृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ व शिवशाहू प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान उत्सवाच्या...

बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ व शिवशाहू प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान उत्सवाच्या माध्यमातुन १००२ रक्त पिशव्यांचे संकलन


मुंबई -: मुंबई व महाराष्ट्रातील जवळपास सर्व रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत होता.
आपली सामाजिक जबाबदारी जाणून, नायर हॉस्पिटल, के.इ.एम. हॉस्पिटल व वाडिया हॉस्पिटल यांच्या विनंतीला मान देत रक्तदान उत्सव-२०२२ रविवार दि.१३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ना.म.जोशी म्युनिसिपल शाळा, पहिला मजला व तळ मजला सभागृह, डिलाईल रोड, लोअर परळ (पूर्व) मुंबई-१३ येथे आयोजित करण्यात आला होता. देशाच्या सीमांचे संरक्षण करणारे सैनिक वेळप्रसंगी आपले रक्त सांडून कर्तव्य बजावत असतात. रक्तार्पणाची ही संधी सर्वसामान्य जनांना प्राप्त व्हावी व आपल्या सामाजिक बांधिलकीची जोपासना करता यावी हा उद्देशही यामागे होता.


मुंबई-ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांनी तसेच शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कोल्हापूर वासीयांनी या रक्तदान महायज्ञात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. १००२ रक्त पिशव्यांचे संकलन, शिवशाहू प्रतिष्ठान तसेच बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या मागील १५ दिवसांच्या मेहनतीचे फलित होते.
रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ख्यातनाम, लोकप्रिय चित्रपट कलाकार सिद्धार्थ जाधव या शिबिरास आवर्जून उपस्थित राहिले. वृत्तपत्र विक्रेता हा समाजातील एक महत्त्वाचा घटक असून आपणही आपल्या लहानपणी वृत्तपत्र घरोघरी पोहोचविण्याचे काम केले होते व तुम्ही जे कार्य हाती घेतले आहे ते पाहून खरोखरच तुमचा सर्वांचा अभिमान वाटतो. थोड्याच दिवसात प्रदर्शित होणाऱ्या बालभारती चित्रपट शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा असेल व तुम्ही तो सर्वांनी जरूर पहा असे आवाहनही त्यांनी केले. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक श्री. नितीन नंदन यांनी रक्तदात्यांना ते करत असलेल्या श्रेष्ठ दानाची महती सांगितली.
सर्व १००२ रक्तदात्यांना भेट स्वरूपात वर्तमानपत्राचे महत्व दर्शविणारे टी-शर्ट, बॅग (SACK) व वॉटर बॉटल अशा तीन वस्तु भेट स्वरूपात देण्यात आल्या.


या सामाजिक उपक्रमास श्री. विलास पाटील अध्यक्ष – लोकशांती को.ऑप. क्रेडिट सोसायटी, श्री. निलेश मानकर अध्यक्ष -तिरुपती को.ऑप. क्रेडिट सोसायटी व महावीर इंटरनॅशनल ट्रस्ट मुंबई,
लोअर परेल व्यापारी असोसिएशन, इंडियन ऑइल लुब्रिकन्ट, तसेच श्री. प्रवीण कुंभोजकर (उपसचिव विधी व न्याय- महाराष्ट्र) व विनोद देसाई (डेप्युटी कमिशनर जी. एस. टी.) यांचे विशेष सहकार्य लाभले.
वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे प्रमुख पदाधिकारी विजय रावराणे, संजय चौकेकर, मधुसूदन सदडेकर, बाळा पवार, हेमंत मोरे, रवि चिले, जयवंत डफळे, सुशांत वेंगुर्लेकर, संतोष विचारे, प्रकाश वाणी, समिर कोरे, प्रकाश गिलबिले, युनूस पटेल, प्रकाश कानडे, संजय सानप, शंकर रिंगे, राजेंद्र चव्हाण, गणेश खेनट व धनंजय वायाळ यांच्यासह वृत्तपत्र समूहाचे अधिकारी तसेच विविध संघटनेचे व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शिवशाहू प्रतिष्ठानचे रवींद्र देसाई, राजू येरुडकर, कृष्णा पाटील, विनायक आसबे, संतोष वर्टेकर, सतीश पाटील, भरत पाटील, संदीप चव्हाण, तानाजी धनुकटे, संजय कुंभार, सम्राट चव्हाण, धोंडिबा सासुलकर, विनोद देवरकर, अशोक गवळी, भावेश पाटील, संदीप होन्याळकर व सागर चव्हाणसह अन्य पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिराची तांत्रिक व्यवस्था यशस्वीपणे सांभाळली.
शिबिराची सांगता बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाचे विश्वस्त श्री. जीवन भोसले यांनी सर्वांचे आभार मानून करण्यात आली.

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303

लेखक व कवींना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी / लिंक मराठी हे न्यूज पोर्टल घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी .
तुमचे स्वलेख नावासह प्रसिद्ध केले जातील ; यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular