अनंतात जाणारच देह
मग कसली चिंता सतावते
श्वास चालू तू जगून घे
पक्षी स्वच्छंदी उडते….
भरभरून जगताना तू
मारून टाक तुझा अहंकार
द्वेष मत्सर हवाच कशाला
जाळूनच टाक ते विकार…
इथं तिथं शोधत बसला
तुझ्यातच आहे तो आनंद
काजळी तेवढी पुसून टाक
जागा होईल तो ब्रम्हानंद…..
कर्मण्येवाधिकारस्ते
मा फलेषु कदाचन
सत्कर्मच करत रहा
सदा ठेव आठवण….
भरभरून जगताना
पुन्हा बालपण आठवावे
तेच तुझे खरे रूप
तसेच जीवन जगावे….
– कवी किसन आटोळे सर
वाहिरा ता.आष्टी

मुख्यसंपादक