Homeवैशिष्ट्येभाग ४७- स्थानिक निधी संकलन

भाग ४७- स्थानिक निधी संकलन

भाग ४७
स्थानिक निधी संकलन

ग्रामीण भागात निधी संकलन
निधी संकलनाबाबत आपण बरेच काही आतापर्यंत पाहिलेले आहे तरी वेगवेगळ्या पद्धतीने आपणास इतर साधन संपत्ती कशी उपलब्ध करून घेता येईल आणि त्यातूनही स्थानिक पातळीवर कुठ्ल्या प्रकारची निधी उपलब्ध करता येईल ह्यावर विचार करणे अतिशय महत्वाचे आहे.

निधी संकलनाचे मुख्यत्वे दोन भाग :
निधी संकलन
ग्रामीण भाग :-
• देवस्थान मंडळ
• को-ऑफ सोसायटी मोठे शेतकरी
• पुढारी
• ट्रस्ट
पद्धत :- 🔹जत्रा / उरूस
🔹भजनी मंडळात
🔹व्यक्तिश: भेटून
शहरी भाग :-
• वैयक्तिक देणगीदार
• फाऊंडेशन
• कॉर्पोरिट्स
• ट्रस्ट

 पद्धत :-  🔹 मिटिंग 
               🔹सादरीकरण 
               🔹फिल्म 
               🔹इतर साहित्य 

ग्रामीण : निधी संकलन ग्रामीण भागात वेगळ्या पद्धतीने करावे लागते. धन स्वरुपापेक्षा वस्तू स्वरुपात निशी संकलन करता येऊ शकते.एका जागी प्रयोग यशस्वी झाला.म्हणजे दुसऱ्या गावात पण तोच यशस्वी होईल असे नाही. ग्रामीण भागात किंवा निमशहरी भागात ऋतुमानानुसार आपल्याला लोकांना भेटाव लागत.

कुठल्या पद्धतीने करू शकतो ?
भजनी मंडळात : ग्रामीण भाग किंवा निम शहरी भागात भजनी मंडळ हे नेहमी कार्यरत असतात. नियमितपणे भेटणाऱ्या ह्या व्यक्तीशी संपर्क साधून आपण आपल्या कामाची विस्तृत माहिती देऊन एकदाच नाही पण नियमितपणे त्यांना मदत करायला आव्हान करू शकता.
उरूस किंवा जत्रा : इथे मोठ्या प्रमाणात लोक येत असतात. आपण आपल परिपत्रक किंवा मोठे पोस्टर लावून, वीज उपलब्ध असेल चित्राद्वारे लोकांना आवाहन करू शकता. तरी जत्रेत लोक वेगळ्या मूढ मध्ये असले तरी आपल्या मांडणीमध्ये थोड वेगळेपण आणि आकर्षकपणा असेल तर लोक तुमच काम आवर्जून पहायला/समजून घ्यायला येतील.
▶️ आपल्या संस्थेबद्दल माहिती एका जागी किंवा …याच्या ठिकाणात देता येईल.
▶️ मोठे शेतकरी ( नगदी पिक घेणारा ) किंवा जमीनदार यांना वैयक्तिकरित्या भेटून त्यांच्याकडून संस्थेसाठी देणगी घेऊ शकता. पैसे किंवा इतर धान्य, वस्तू स्वरुपात ते मदत करू शकतात. अशी अनेक उदाहरण आहेत की ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात भूदान केलेले आहे आणि आपल्या गावात मोठ्या प्रमाणात समाजभल्यांच काम उभ करायला मदत केली आहे.
▶️ पतसंस्था, दुध सहकारी संस्था किंवा उसाचे कारखाने : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात या संस्था कार्यरत असतात. पतसंस्थेत, दुध सहकारी संस्था, किंवा उसाचे कारखान्यात खूप सदस्य असल्यामुळे वैयक्तिक पातळीवर त्यांची मदत होऊ शकेल. त्यांच्या मिटींगच्या वेळेला जाऊन आपल्या संस्थेबद्दल पत्रकाद्द्वारे, भाषणाद्वारे, फिल्मद्वारे संवाद साधू शकता. आसपासचा दुध सहकारी संघ, पत संस्था अशा संस्थाना जरूर भेट द्यावी.
▶️ ग्रामीण भागात धार्मिक विधिना खूप महत्व आहे. देवस्थानाच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो. देवस्थानामध्ये कार्यालय चालवण्यासाठी त्यांची परवानगी काढून स्वयंसेवी संस्था आपल काम चालू ठेऊ शकतात. याचा महत्वाचा उपयोग म्हणजे ग्रामस्थांचा विश्वास लवकर संपादन करता येऊ शकेल शिवाय पुढे त्यांच्याच सहभागातून काम उभ करण ही प्रभावी ठरेल.
▶️ पुढारी किंवा राजकीय नेते आपल्या गावासाठी सेवा करायला उत्सुक असतात. त्यांना योग्य वेळी भेटून योग्य कामांसाठी मदत मागू शकतो. राजकीय नेत्यांकडून कुठल्या पद्धतीने मदत घ्यायची हे मात्र आपणच ठरवायला हवं.

निमशहरी भागात :
▶️ निमशहरी भागात पर्याय जास्त उपलब्ध आहेत व संस्था पण खूप आहेत.
▶️ वैयक्तिक पातळीवर लोक वेगवेगळ्या कारणासाठी देतात. अतिशय कमी रक्कमेपासून मोठी देणगी देणारे आहेत. वस्तू किंवा पैसे स्वरुपात देणगी दिली जाते.
▶️ कॉपेरिट : छोट्या साॅफ्टवेअर कंपनीज, कारखाने, राष्ट्रीय बँक, ग्रामीण बँक, यांनी त्यांच्या फायद्याचे २-३% सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक हिताच्या कामांसाठी देऊ शकतात.
▶️ फाऊंडेशन : हि वैयक्तिक असू शकतात किंवा काही जणांनी मिळून केलेली असू शकतात. हि स्थानिक पातळीवर स्थापन झालेली असतात त्यांची उद्दिष्टे व आपल्या संस्थेची उद्दिष्टे मिळती-जुळती असतील तर आपल्याला ते मदत करू शकतील.
▶️ सरकारी : मोठ्या पातळीवर सहकारी निधी उपलब्ध आहे. राज्य सरकार किंवा केंद्र सहकाराच्या अनेक योजना राबवायला स्वयंसेवी संस्थाना भरपूर संधी आहे.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular