Homeवैशिष्ट्येभाग-८ रोख रकमेचा बँकेत भरणे व रोखीने केले जाणारे खर्च

भाग-८ रोख रकमेचा बँकेत भरणे व रोखीने केले जाणारे खर्च

MNDA भाग:-रोख रकमेचा बँकेत भरणेवरोखीने केले जाणारे खर्च
अ ) संस्थेच्या एकंदर रोख व्यवहाराची गरज लक्षात घेऊन कमीत कमी व्यवहार रोखीने करणे आवश्यक तेवढीच रक्कम हातात ठेवून उर्वरित रक्कम बँकेत भरणे आवश्यक आहे . कोणत्याही परिस्थितीत मोठी रक्कम हातात ठेवणे टाळावे .
ब ) मोठ्या आर्थिक व्यवहार असणाऱ्या संस्थांमध्ये विशेषत : रुग्णालये , शाळा वगैरे यात जमा झालेली त्या दिवसाची सर्व रक्कम जशीच्या तशी बँकेत भरणे आवश्यक आहे . रोख खर्चासाठी बँकेतून निराळी रक्कम काढून त्यातून खर्च करण्यात यावा . या पध्दतीमुळे रोजच्या रकमेवर व्यवस्थित नियंत्रण ठेवता येतो .
लक्षात ठेवा:- संस्थेचा खर्च शक्यतो चेकनेच करावा . रोखीतून खर्च फक्त किरकोळ रकमेचा व अत्यावश्यक असेल तेव्हाच करण्यात यावा . ह्यासाठी सोयीनुसार जास्तीत जास्त खर्च रोखीत करण्यासंबंधी मर्यादा ठरवून देण्यात यावी . उदा . रु . ५०० / – किंवा रु . १००० / – वरील खर्च चेकनेच केले जातील
हातातील रोख रक्कमेचा संरक्षक विमा:-
अ ) हातातील रोख रक्कम बँकेत भरणा करण्यासाठी नेली जाणारी व बँकेतून काढून आणलेली रक्कम वगैरे चौरी , लटूमार , अपहरण यापासून धोके टाळण्यासाठी असणाऱ्या विमा पॉलिसीचा जरूर फायदा घ्यावा .
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
माहिती संकलन:-युवराज येडूरे,अध्यक्ष:महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन भारत ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular