Homeमाझा अधिकारभारतीय संविधान कलम 17

भारतीय संविधान कलम 17

आपल्यात जातीच राजकारण मोठ्या प्रमाणात केलें जाते विविध धर्म जाती एकामेकासोबत जातीच्या नावावर लढत असतात त्यासाठी भारतीय संविधान कलम 17 नुसार “अस्पृश्यता” नष्ट करण्यात आली आहे व तिचे कोणत्याही स्वरुपातील आचरण निषिध्द करण्यात आले आहे. अमुक या जातींचा तमुक त्या जातींचा हे आपल्या मनात समाजातील समाजकंटक लोकांनी भरवले आहे. जन्माला येणारया लहान मुलाला त्याची जात कोणती माहिती नसते मोठे झाल्यावर आई वडील. सांगतात म्हणून मी या जातींचा आहे असे त्या मुलाला कळते. आपल्यातून ज्या दिवशी ” जात” ही संकल्पना नष्ट झाली पाहिजे. ज्या दिवशी जात वर्ग नष्ट होईल त्या दिवशी राजकारण संपेल. आणि आपण सर्वजण सुखी समाधानी पणाने नांदू. मानव एक आहे मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे. मानव ही एकच जात आहे. ” अस्पृश्यतून ” उद्भवणारी कोणतीही नि समर्थता. लादणे. हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध आहे. यासाठी भारतीय संविधान कलम 17 नुसार. अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती ( अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९

Table of Contents

कायद्याचा विस्तार / तरतुदी/ कलमे. / शिक्षा / दंड खालील प्रमाणे तरतूद करण्यात आली आहे

विस्तार. * जम्मू काश्मीर हे राज्य वगळता संपूर्ण भारतात याचा विस्तार आहे

. प्रकरणे * या कायद्यात एकूण पाच प्रकरणे आहेत

प्रकरणं. (१) कायद्याच्या व्याख्या. यात कायद्याने संक्षिप्त नाव व विविध व्याख्या नमुद करण्यात आलेल्या आहेत

प्रकरण (२) अत्याचाराचे. अपराध शिक्षा. व दंडाच्या तरतुदी या प्रकरणांत नमुद असून त्यातील प्रमुख तरतुदी खालील प्रमाणे

कलम. (३) (१) (१) अनुसूचित जाती अथवा अनुसूचित जमाती यांचा सदस्य नसलेला जो कोणी अनु जाती वा अनु जमाती. कोणत्याही व्यक्तिस कोणत्याही असाध्य किंवा घृणास्पद पदार्थ. ज्याच्या अन्न वा पेय म्हणून समावेश होत नाही असा पदार्थ खाण्याची. / पिण्याची जबरदस्ती करेल असा व्यक्ति

कलम. (३) (१) (२) संबंधित सदस्यांचा वास्तव्याचा जागेत /घराच्या ओट्यावर / दारात / इजा वा अपमान करण्याचा वा त्रास देण्याच्या उद्देशाने घृणास्पद पदार्थ टाकण्याचे कृत करणे

कलम. (३) (१) (३). संबंधित प्रवरगाचया पुरुष/ महिलांच्या अंगावरील कपडे फेडणे नग्नावस्थेत/ रंगवलेल्या चेहर्याने / नग्न शरिराने धिंड काढणे. / मानवी प्रतिष्ठेला अवमान करणारे कोणतेही कृत्य करणे

कलम. (३) (१) (४/५ ) संबंधित सदस्यांची मालकीची कोणतीही जागा अन्यायाने घेणे. लागवड करणे. जमीन/ जागा वापरणेस अडथळा निर्माण करणे

कलम (३) (१) (७) अमुकच व्यक्तिला मतदान करण्यास भाग पाडणे / दडपण/ धाकटपटशा करणे

कलम (३) (१) (८) कोणत्याही व्यक्तिस ते निर्दोष असल्याचे माहीत असूनही त्यांच्याविरुद्ध कोर्टात खोटा द्वेष मुलक किंवा तापदायक दावा अथवा फौजदारी वा अन्य वैध कार्यवाही दाखल करणे

कलम (३) (१) (९) संबंधित प्रवरगाचया व्यक्तिचे काम होऊ नये व त्यांना त्रास होईल या वाईट उद्देशाने कोणत्याही लोकसेवकाला खोटी व दिशा भूल करणारी वा शुद्र माहिती पुरविल

कलम (३) (१) (१०) सार्वजनिक ठिकाणी चारचौघात शिवीगाळ जातीवाचक. पाण उतारा. अपमान करणे. किंवा धाकदपटशा दाखविणे

कलम. (३) (१) (११) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कोणत्याही महिलेवर तिची बेअब्रू वा तिचा विनयभंग करण्याच्या हेतूने हल्ला करणे. बळाचा वापर करणे. विनयभंग करणे

कलम (३) (१) (१२) कोणतीही अनुचित जाती जमाती मधील महिला आहे हे माहीत असूनही स्वबळाचा वापर करून त्या महिलेच्या इच्छेविरुद्ध तिचे लैंगीक शोषण करण्यासाठी त्या परस्थितीचा फायदा घेणें

कलम (३) (१) (१३) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या लोकांकडून वापरला जाणारा कोणताही पाण्याचा झरा. तलाव. जलाशय. विहिरी. वा अन्य कोणताही जलस्त्रोत यामधील पाणी ते सर्वसाधारण पणे. ज्या प्रयोजनासाठी वापरले जात असेल त्यासाठी अयोग्य ठरेल अशा रितीने घृणास्पद पदार्थ. विषारी पदार्थ. टाकून दुषित किंवा खराब करणे

कलम (३) (१) (१४) कोणत्याही अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या व्यक्तीस सार्वजनिक राबतयावर ठिकाणी जाण्यासाठी येण्यासाठी रुढी परंपरा अधिकार नाकारेल वा प्रतिबंध करणे

कलम (३) (१) (१५) संबंधित व्यक्तिंना त्यांचे सवताचे राहण्याचे घर. गाव. जागा. वा अन्य निवासस्थान सोडून जाण्यास भाग पाडणे किंवा जबरदस्ती करणे

  वर नमूद कलम (३) (१) (१) ते कलम (३) (१) (१५)  पर्यंतचा कोणताही अपराध सवरणाना केल्यास त्यास सहा महिन्यांहून कमी नाही परंतु पाच वर्षांपर्यंत वाढविता येईल एवढ्या मुदतीच्या कारावासाची आणि द्रव्य दंडाची शिक्षाही देण्यात येईल
    अन्य गंभीर अपराध व शिक्षा आणि  दंडाची तरतूद 
 -  क्रमंशा
अहमद नबीलाल मुंडे
   समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular