Homeमाझा अधिकारभ्रष्ट् व खर्चिक निवडणूका व पैशांचा वापर

भ्रष्ट् व खर्चिक निवडणूका व पैशांचा वापर

लोकशाही व्यवस्थेचा ठराविक काळानंतर नियमित होणार या निवडणुका हा प्रमुख कणा असतो. ह्या राज्यव्यवस्थेत वेळोवेळी बिनचूक आणि निःपक्षपाती निवडणूका होणे हे जिवंत लोकशाहीचे लक्षण मानले जाते. मतदान यांना आपल्या प्रतिनिधींचे काम पाहून आपल्या पसंतीच्या प्रतिनिधी निवडण्याची संधी मिळते. परंतु आपल्या लोकशाही प्रक्रियेत निवडणूका म्हणलं की प्रचंड भ्रष्टाचार. दंडुकशाही. जाती. धर्माचा वापर. खोटी आश्वासने. पैसै भांडी वाटप व अन्य वस्तू वाटप. जेवणाच्या पार्ट्या. काळया पैशांचे थैमान. मतदान पळविणे. धमकावने. घाऊक मतदार विकत घेणे. इत्यादी गोष्टी आणि त्याचबरोबर आत्ता आलेल्या. गुन्हेगारी टोळ्या. व त्यांची वारंवार. होणारी ” टोळीयुद्ध ” ( गॅगवार ) ह्याचा वाढता हस्तक्षेप. असे समीकरण तयार झाले आहे. निवडणूक मग ती लोकसभा असो अथवा ग्रामपंचायत. एखाद्या प्रभागासाठी असो. तेथे हे सर्व घटक कार्यरत दिसतात. आपल्या व्यवस्थेत निवडणूका व त्या जिंकण्यासाठी केलेल्या भ्रष्ट आचरणानेच सार्वजनिक जीवन गढूळ करून टाकले आहे. शुध्द राजनीती ऐवजी घाणेरडे. फोडाफोडी. घराणेशाही दबाव. असे राजकारण सुरू आहे. राजकारण करायचे आणि ते साधायचे. म्हणजे सत्ता हवी. सत्तेचे राजकारण करायचे त्यासाठी वाटेल तो मार्ग अवलंब आला. सत्ता हेच अंतिम साध्य झाल्याने राजकीय पक्षांनी साधनशुचिता खुंटीला टांगली आहे. सत्ता रितसर पद्धतीने संपादित करण्याचा निवडणूका हा सनदशीर मार्ग असल्याने निवडणूकीचया वेळी राजकीय पक्षांची भाऊ गर्दि होणे क्रमप्राप्त आहे. लोकशाही व्यवस्थेत निवडणूका लढविण्यासाठी आणि त्या जिंकण्यासाठी प्रखर प्रयत्न करणे. प्रत्त्येक राजकीय पक्षांचे उद्दिष्ट असते. त्या अनुषंगाने राजकीय पक्षानी आपले कार्यक्रम व अगोदरच आखले जातात. डावपेच लढवावे हे सर्व क्रमप्रापत असते. परंतु आपल्या व्यवस्थेत निवडणूका एवढाच केवळ राजकीय पक्षांचा ध्यास आहे. आणि श्वास आहे. हे त्यांच्या राजकीय अपरिपकतेचे लक्षण मानावे लागेल. राजकारण हे जनतेच्या सेवेचे साधन आहे व सत्ता जनतेच्या कल्याणासाठी वापरायची असतें. हे सर्व पक्ष विसरले. राजकीय पक्षासंबधी येणाऱ्या बातम्या. नेत्यांचे परिपत्रक. कार्यकर्ते. कार्यक्रम. प्रचार सभा. आंदोलन. ह्यांना केवळ निवडणूकीची आस लागलेली असते. हेच स्पष्ट दाखविले. निवडणूका हाच आपल्या राजकीय पक्षांचा एक कलमी कार्यक्रम झाला असून त्याचे संपूर्ण राजकारण ह्या एका केंद्र बिंदू भोवती फिरताना दिसते. जनतेचे प्रबोधन करणे आपले काम आहे. हे सर्व पक्ष पूर्णपणे विसरले
देशाचे राजकारण हे निवडणुकांमध्ये झाल्याने काही प्रश्न उभे केले आहेत. त्यांचा निवडणूका वर प्रभाव जाणवतो. भारतातील प्रचंड भ्रष्टाचाराचे एक प्रमुख कारण निवडणूका वर होणारा बेमाफि व प्रचंड होणारा खर्च हेही आहे. भारतातील निवडणूका वर प्रभाव टाकणाऱ्या काही प्रमुख घटकांचा थोडक्यांत विचार केला तर आपले बरेच प्रश्न सुटतील
आत्ता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पैसा आपल्या राजकीय व्यवस्थेत निवडणूका हा प्रमुख केंद्र बिंदू झाल्याने निवडणूका वर पैशांचा प्रभाव वाढत चालला आहे. समाजासाठी. व राष्ट्रासाठी केलेला त्याग आणि निस्वार्थ बुध्दीने केलेली समाजसेवा ही निवडणूकीची पूंजी नाही. तर निवडणूका हया पैशाच्या जोरावर लढविल्या जातात आणि जिंकल्या जातात. किंबहुना ” अधिक पैसा ” ही आत्ता निवडणूक लढविण्याची किमान पात्रता झाली आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकांचे राजकारण करण्याच्या आघाडीवर असल्याने तारतिक दृष्ट्या त्यांच्यावर पैशांचा प्रभाव पडणे. क्रमप्रापत आहे. त्यामुळे राजकीय पक्ष उमेदवार निवडताना कोणाची खर्च करण्याची तयारी आहे. कोण पक्षाला अधिक पैसा मिळवून देऊ शकतो. त्यालाच तिकीट मिळते. त्यामुळे आत्ता बहुतेक पक्षात पक्षांचे काम करणारे कार्यकर्ते व निवडणूक लढविणारे “उमेदवार” ह्यांचे दोन वेगवेगळे स्तर झालेले दिसतात कार्यकर्ता हा पक्षांचे काम मन लावून व निष्ठापूर्वक करित असला तरी कार्याच्या जोरावर तो पक्षांचे तिकीट सहसा विनासायास मिळवू शकत नाही. ह्या उलट आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेली व्यक्ती त्याचा समाजसेवा करण्याचा किंवा केल्याचा कोणताही पाठपुरावा नसला तरी नवखी व्यक्ति ऐनवेळी तिकीट मिळवून पक्षांचा उमेदवार म्हणून उभी राहते. अलीकडे राजकारणात. खेळाडू. चित्रपट तारे. व तारका. स्वामी. ह्याचाही प्रभाव वाढत चालला असून त्यामागे सर्वात मोठे कारण आहे ते म्हणजे आर्थिकच आहे
राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात उधोगपती व भांडवलदार यांचेकडून आर्थिक देणग्या मिळवतात. त्यामुळे त्यांचा प्रभावही वाढत आहे अलिकडे “प्रायोजक ” मिळविण्याची प्रथा पडल्याने असे उधोगपती निवडणूकात ” प्रायोजकाची ” भूमिका पडद्यामागून पार पाडताना दिसतात उधोगपती भांडवलदार ह्यांच्या काळया पैशास निवडणूक देणग्या मुळे गुंतवणूकीस चांगली जागा मिळाली. काळया बाजारात मिळवलेला पैसा रितसर करण्याचे महत्वाचे माध्यम म्हणजे निवडणूका होय ह्या काळया पैशाच्या जोरावर पक्षांचे कार्यकर्ते कार्यक्रम जाहिरात प्रचार व जाहिरनामयावर प्रतिबिंब उमटले आहे देणगी देणारे उदयोगपती ना त्यांच्या पक्षांची कृपा दृष्टी राहते. त्यामुळे काळया पैशांचे स्त्रोत धुंडाळून काढणे खूपच कठीण आहे.
निवडणूका मध्ये उदयोगपती, चित्रपट तारा, तारकांच्या काळया पैशांचे थैमान चालू असताना संघटित गुन्हेगारी विश्वासाचा काळा पैसा निवडणुकीच्या रिंगणात गुंडांच्या फौजा व शस्त्रे सज्जता येऊ लागली आहे. विशेषत १९१९ चया मध्यवर्ती निवडणूकीत नंतर गुन्हेगारी विश्वाची जी प्रकरणे बाहेर आली. त्यातून गुन्हेगारी विश्वाचा राजकारण्यांशी असलेला संबंध , गुन्हेगारांना मिळालेली राजकीय प्रतिष्ठा ह्या प्रतिषटेतून त्यांनी उभारलेले उद्योग आणि त्यांनी जिंकलेल्या निवडणूका हे विचारात घेता. आपण आपले गाव, तालुका, जिल्हा, राज्य देश सुरक्षित आहे का ? मला वाटतं नाही का वाटत नाही कोणाला माहित ? गुन्हेगारी विश्वातील काळया पैशांची राजकीय दहशत, गुंडांची निर्मिती, अवैध धंदे, व्यसनाधिनता, खून मारामाऱ्या अपहरण बलात्कार यांसारखी दहशत व त्यांचे होत असलेलें उदात्तीकरण राजकारणाला ग्रासून टाकताना दिसून येईल
काळया पैशाच्या जोरावर गुंडगिरीचा प्रभाव हा सुद्धा भारतीय राजकारणाला मिळालेला एक शाप आहे. काळा पैसा, दडपशाही, शसत्र गुंडांची फौज, हे ज्याचे कडे आहे तो निवडणूक जिंकणारच हे आत्ता निश्चित झाले आहे मतदान काळात मतपेट्या पळविणे. लोकांना मतदान करण्यासाठी बाहेर न येवून देणे, मतदान केंद्रे काबीज करणे, मतदार यांना व केंद्रावरून पळवून लावणे, खोटे मतदार उभे करणे. बाॅमबसफोट घडवून आणने. प्रतिस्पर्धी उमेदवार याचा काटा काढणे. असे अनेक प्रकार आपल्या लोकशाही राजकीय व्यवस्थेत, भ्रष्ट निवडणूका, खर्चिक, व त्यात पैशांचा वापर केला जातो हे दुर्दैव आहे.

अहमद नबीलाल मुंडे

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा


अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular