तुझ्या कानातलं डुल
कसं हळूच डुलतं
त्याच्या आवाजानं
मन माझं तुझ्याकडं वळतं
चाफेकळी नाक तुझं
त्यावर नथीचा तोरा
कमनीय बांधा अन्
रंग तुझा गोरा
शराबी आहे ते
लाल ओठ तुझे
घायाळ करिती हे
अल्लड हृदय माझे
स्मित हास्य तुझं
गोड गालावर खळी गं
प्रेम जडलं माझं
तू गुलाबाची नाजूक कळी गं
गालावर येणारी बट
तू अलगद बोटानं सावर
जीवघेण्या त्या नजरेला
तुच आता आवर
कपाळी तुझ्या बिंदी
अन् चंद्रकोर टिकली
मिलनाच्या या रातीला
ही लावण्यवती सजली
अंबाड्यात फुललाय तुझ्या
मोगऱ्याचा गजरा
ये मिठीत सजने
मधुचंद्र करुया साजरा…!
संदीप देविदास पगारे
( नांदूर मधमेश्वर-नाशिक )

मुख्यसंपादक