Homeमुक्त- व्यासपीठमहिला दिन विशेष

महिला दिन विशेष

आपण लेक असतो. ..
पत्नी ,स्नुषा,माता बनतो
कार्यस्थळीही झोकून देतो
अष्टभुजा, सुपरवूमन होतो
सतत कोणासाठी काहीतरी
करत रहातो,धावत राहातो
आपण स्वत:साठी कधी जगतो?
स्वतःसाठी एवढासा खर्च करणे
आपण गुन्हा समजतो
स्वतःच कमावलेले स्वतःसाठी
उपयोगात आणतानाही
आपण कचरतो!!
आपले घरातले दुय्यम
अहं तिय्यम स्थान
आपणच मान्य करतो
म्हणूनच आपल्याला महिला दिन हवासा वाटतो.


चला
आजपासून एक ठरवूया.
दिवसाचा काही वेळ
स्वतःसाठी ठेऊया.
जगासाठी जगलो,
स्वतःसाठी जगूया.
वेगळा महिला दिनच नको
म्हणून प्रयत्न करत राहूया !

डॉ . समिधा गांधी

https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303

लेखक व कवींना व्यासपीठ निर्माण करण्यासाठी लिंक मराठी हे न्यूज पोर्टल घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी .
तुमचे स्वलेख नावासह प्रसिद्ध केले जातील ; यासाठी कोणताही मोबदला घेतला जात नाही.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular