मी आनंदाने दु:खालाही मिठी मारली आहे,
लाख संकटांना अशीच धूळ चारली आहे..
ह्रदयाची जागा सुध्दा राहिली नाही सुरक्षित,
कुण्या मांत्रिकानी मूठ मारली आहे..
उगवतीलच कसे या आयुष्यात काटे ?
आजन्म मी फक्तं फुलं पेरली आहे..
कशी सांभाळावी माझी झोपडी आता ?
तुझी वावटळ घरात शिरली आहे..
भेटलो होतो ज्या रुक्ष बागेत आपण एकदा,
तेंव्हापासून ती बाग ही बहरली आहे…!!
- प्रविण घुले
( कोळसांगवी )

मुख्यसंपादक
Nice poem
Very nice
Super