Homeवैशिष्ट्येया मंदिरात प्रवेश करण्याचे धाडस कोणी करत नाही कारण…

या मंदिरात प्रवेश करण्याचे धाडस कोणी करत नाही कारण…

   मंदिरात जाऊन पूजा अर्चा करणारे , भक्तिभावाने नमस्कार करून साकडे घालणारे , श्रद्धा किंवा इतर नानाविध कारणासाठी मंदिरात प्रवेश करणे तर आलेच पण लोटांगण घेणारे आपण आजवर खूप पाहिले असतील.मंदिरात गेल्यावर एक विलक्षण शक्ती येते आणि आपली दुःख , वेदना , भीती नाहीशी होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हे आपण ऐकले किंवा अनुभवले असालच..मात्र भारतात असे एक मंदिर आहे जिथं जाण्याचे धाडस सर्वसामान्य माणूस करू शकत नाही . या मंदिराची ख्यातीच अशी आहे की नकारात्मक शक्ती तर सोडाच पण भाविक सुद्धा दर्शनासाठी येण्यासाठी धाडस करीत नाहीत. 
         होय, आम्ही भारतातीलच हिमाचल प्रदेशातील चंबा प्रांतामध्ये भरमोर नामक लहानशा गावामध्ये असलेल्या मंदिराबद्दल सांगत आहोत. मंदिर लहान असले तरी त्याची ख्याती दूरवर पसरली आहे , या मंदिरात भाविक आलेच तरी ते त्या गाभाऱ्यात प्रवेश न करता बाहेरून दर्शन घेण्यासाठी प्राध्यान्य देतात. 


https://youtu.be/dxStcPU73tc


    कारण हे मंदिर यमदेवाचे आहे. खास यमदेवाची मंदिरे तशी भारतात कमीच आहेत. भरमोर येथील या यम मंदिरात प्रवेश करण्याची मुभा फक्त यमदेवनाच आहे अशी मान्यता येथे रुढ असल्याने कोणी प्रवेश करण्याचे धाडस करीत नाही . 
      या मंदिरात चित्रगुप्त साठी एक कक्ष ( जागा ) आहे असे स्थानिक ग्रामस्थ म्हणतात. चित्रगुप्त हे जगातील सर्व मनुष्याच्या चांगल्या वाईट कर्माचा हिशोब ठेवतात व त्या प्रमाणे मृत्यूनंतर स्वर्गात की नरकात घालवायचे हे ठरवण्याचा अधिकार त्यांना असतो अशी समजूत आहे.      भरमोर मधील या यम मंदिरामध्ये चार दरवाजे असून ते सोने , चांदी , तांबे आणि लोखंड या धातूंनी बनवले आहेत . ज्या मनुष्याने आयुष्यभर वाईट कर्मे केली त्याच्या आत्मला मृत्यूनंतर लोखंडी दरवाज्यातून परलोकात पाठवले जाते , तर पुण्यकर्मे केली तर त्यांचे आत्मे सोन्याच्या दरवाजातून परलोकात पाठवले जातात अशी आख्यायिका सांगितली जाते.

http://linkmarathi.com/%e0%a4%b9%e0%a5%8b%e0%a4%af-%e0%a4%b9%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%97-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a8/
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular