कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
बघ नभी तो सजला कसा रजनीश…..
करूया जागरण पाहूया
दुधात तो मेहताब…
चंदा मामा आज येईन माझ्या अंगणात देईन रे मी तुला दुधखीर
छकुली,सोन्याचा लाडका रे तू
सुधाकर….
बहरली निशा सजल्या तारका
सोळा कलांनी सजला बघ शशांक…
झाला प्रकाश चोहिकडे प्रगटला
कलानिधी तो तारानाथ….
करते औक्षण तुझे दिप लावते गाभारी सुधापती…
उजळु दे तुझ्या तेजाने भाग्य माझे रजनीपती…
- सौ.भाग्यश्री आपेगांवकर
ता- अंबेजोगाई
जि-बीड
मुख्यसंपादक