रूप पालटले

आले आभाळ भरून
रूप पालटले सारे
ढोल ताशे वाजवत
वीज पाऊस नि वारे ..

गीत गातोया कोकीळ
नृत्य करितो मयूर
आसमंत दणाणून
पालटला सारा नूर …

दिसे चहूकडे पाणी
झरा वाहे खळखळ
आले जुळून संगीत
पानं करी सळसळ …

शीळ वाजीतो कुणबी
आज न्हाली ही धरणी
रूप सारे पालटले
देवा तुझी ही करणी ..

  • किसन आटोळे सर

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular