HomeUncategorizedविदयार्थ्यांची पायपीट थांबणार कधी ?

विदयार्थ्यांची पायपीट थांबणार कधी ?

कोरोना नंतर हळूहळू पूर्वपदावर आलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या बसेस पुन्हा थांबल्या.कामगारांच्या मागण्या मान्य होण्यासाठी एस.टी. कर्मचाऱ्यांनी संप पुकारला…त्याचा अजूनही निकाल लागला नाही….कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यावर राज्यसरकारने लवकर तोडगा काढणे गरजेचं आहे.
मी गावी कोल्हापूर ला गेलो…कामानिमित्त चंदगड – नेसरी ला गेलो असताना उन्हाच्या झळेतून डांबरी रोड वरून घरी शाळेतून,हायस्कुल – कॉलेज मधून चालत निघणारी मुले-मुली दिसल्या.वरून लागणारे उन्हाचे चटके आणि चपलातुन् निघणारी आग यामुळे पाय आणि डोकं तापून जात होत त्या मुलांचं.डोक्यातून घामाच्या धारा निघत होत्या.दोन-चार किलोमीटरचा रोजचा प्रवास ती मूल करत होती..कोण बायकवाला आला तर त्याला थांबवून त्याच्या गाडीवर बसून जात होती.त्यांचे ते होणारे हाल कोणालाच समजत नव्हते…ना कोणत्या नेत्याला ना मंत्र्याला..!


आजून किती महिने याला ही मूल तोंड देणार?आजून किती उन्हाच्या झळा सोसणार? या मुलानंची काळजी घेणारे कोण पुढे येणार आहे की नाही हे देवास ठाऊक.मुलांची पाईपीट थांबवण्यासाठी एस.टी. बसेसचा संप महाराष्ट्र सरकार कधी मिटवणार याकडेच साऱ्या मुलांचे आणि सामान्य माणसाचे लक्ष्य लागलंय.आज मी कोल्हापूर मध्ये ही दृश्य बघितली ..पण आख्या महाराष्ट्रातील अशी कित्येक गावं असतील की त्यांना एस.टी.बसेस शिवाय कोणताही पर्याय नाही.कित्येक गावातील मुलांना याचा फटका बसत असेल…कित्येक सामान्य लोकांना याची झळ लागत असेल…गावागावातील या येणाऱ्या समस्यावर वाकून बगणारा कोण आहे की नाही …आजून किती हाल सामान्य लोकांनी सोसायचे..!
सरकार कोणाचंही असो पण या मुलांचे होणारे हाल लक्षात घेऊन एस.टी.बसेस च्या संपावर लवकरात लवकर तोडगा काडून राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्यावर कृपा करावी ही विनंती..

शैलेश बाळासाहेब मगदूम
निंगुडगे ता.आजरा

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

1 COMMENT

- Advertisment -spot_img

Most Popular