मुंबई – सीमा शुल्क विभागाने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर घाना येथून आलेल्या एका प्रवाशाकडून 1300 ग्रॅम कोकेन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत 13 कोटी रूपये आहे. 87 कॅप्सूल पोटात लपवून त्याने हे कोकेन आणले होते.
संशय आल्यावर या प्रवाशाला रोखण्यात आले होते व नंतर त्याला रूग्णालयात नेण्यात आले. त्याच्याकडे जे सामान होते त्यात काही आढळले नाही. मात्र त्याने पोटात या कॅप्सुल लपवल्या होत्या. त्याच्या पोटातून तीन दिवसांत कॅप्सुल बाहेर काढण्यात आल्या.
हिंदी चित्रपट मध्ये दाखवल्या प्रमाणे कृत्य दिसत असल्याचे चित्र दिसत आहे.
मुख्यसंपादक