Homeकृषीशेतकऱ्याच्या पोरांनो केसावर फुगे विका मात्र शेती करू नका

शेतकऱ्याच्या पोरांनो केसावर फुगे विका मात्र शेती करू नका

संपूर्ण विश्वातील पहिला व्यवसाय जर कुठला असेल तर तो म्हणजे शेती, जल, जंगल, शेती या तीन गोष्टी त्या काळातील माणसाच्या जगण्याचे साधन होते या आधारावर मनुष्य जीवन विकसित झालेलं आहे, सुरुवातीची नैसर्गिक शेती त्याच्यानंतर पारंपारिक शेती आणि आत्ताची आधुनिक शेती असे स्थित्यंतरे शेती व्यवसायामध्ये आले, समस्त सजीवांसाठी जगण्याचं साधन म्हणजे शेती त्या काळातही आणि आजही आणि ही शेती कसणारा शेतकरी हा खऱ्या अर्थाने या सृष्टी वरील सजीवांचा अन्नदाता आहे, मात्र आज रोजी ह्या अन्नदात्यालाच आत्महत्या करावी लागत असेल तर ती शेती करण्यात काय अर्थ आहे, या देशात रोज 43 शेतकरी आत्महत्या करतात त्याला अनेक असे कारण आहेत, पारंपारिक शेती आधुनिक शेतीत रूपांतरित होताना शेतीमध्ये जे अमुलाग्र बदल झाले ते बदल व शेतीविरोधी असलेले काळे कायदे, ध्येय धोरण, या सगळ्या गोष्टी शेतीच्या पचणी पडल्या नाहीत नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालं तेच तंत्रज्ञान पुढे शेतकऱ्याच्या बोकांडी बसलं, म्हणजे उत्पादन खर्च त्या पटीत निव्वळ नफा उरला नाही शेती तोट्यात गेली पर्यायाने शेतकरी कर्जबाजारी झाला, या कर्जबाजारी शेतकऱ्याला शासनाने वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून सावरण्याचा प्रयत्नही केला मात्रही सगळी प्रणाली सदोष व भ्रष्टाचारी असल्याने शेतकऱ्यापर्यंत याचा थेट लाभ मिळाला नाही म्हणून सरकारी योजनांनी शेतकरी सावरला गेला नाही, देशात महागाईचा राक्षस चालून आला, त्यामध्ये कित्येक उद्योग नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर होते तेव्हा सरकारातील लोकांनी व्यवस्थेतील लोकांनी वेळोवेळी योग्य साह्य करून ते उद्योग वाचवण्याचा प्रयत्न केला, या उद्योगातील कर्ज बुडव्यांना अर्थसाह्य करून सरकारने उद्योगपतींना मदत केली, मात्र देशाच्या सकल उत्पन्नामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या शेतीला दुय्यम स्थान दिले शेतीवर अप्रत्यक्षरीत्या वेगवेगळे कर लादले शेतीसाठी लागणाऱ्या सर्व निविष्ठा महाग केल्या ,आणि येणाऱ्या उत्पन्नाला कमीत कमी भाव देऊन शेतकरी आणि शेती नसतानाबूत केली, व्यापार, उद्योग, शहरांचा विकास, तीर्थक्षेत्र, पर्यटन, रस्ते या अशा ठिकाणी म्हणजे भ्रष्टाचार करून पैसे खायला मिळतील म्हणून भरमसाठ निधी खर्च केला, शेतीसाठी लागणारे पाणी, वीज, बीज, रासायनिक खतं, वेळेवर पतपुरवठा अस्मानी, सुलतानी संकटात मदत या सगळ्या गोष्टी शेतीला मिळाल्या नाही, एक कोटी रुपयांची जमीन असणारा शेतकरी तीन लाख रुपये उत्पन्न काढतो आणि एक लाख रुपये व्यवसायात गुंतवणारा व्यवसायिक वर्षाला तितकेच पैसे कमवून सुखाने जीवन जगतो, हा विरोधाभास पाहून शेतकऱ्यांच्या तरुण पोरांमध्ये एक वेगळा विचार रुजत आहे तो म्हणजे शेती न करण्याचा, मित्रहो मी एक शेतीनिष्ठ किसान पुत्र आहे शेती मातीवर माझा प्रचंड विश्वास आहे पण आजची परिस्थिती पाहता असं लक्षात येते हजार आडथळे पार करून कष्ट करून शेतकऱ्यांनी काढलेले उत्पन्न हे सरकार आपला नीचपणा दाखवून माती मोल भावानं खरेदी करत आहे, व्यापाऱ्यांच्या अधीन असलेले हे सत्तेतील लोक शेतकऱ्यांच्या मानगटीवर बसलेले आहेत या मस्तवाल बैलांना वठणीवर आणण्यासाठी समस्त शेतकऱ्यांच्या पोरांना विनंती करतो की, आपणही छोटासा व्यवसाय थाटावा समोर येईल ते काम करावं मात्र येणारी पुढची पिढी शेतीमध्ये येऊ देऊ नका, अर्थातच केसावर फुगे विका मात्र शेती करू नका…

https://app.groww.in/v3cO/ri3oicpq


संतोष पाटील

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. An impressive share! I’ve just forwarded this onto a friend who had been conducting a little research on this.
    And he actually bought me dinner simply because I discovered it
    for him… lol. So allow me to reword this…. Thank YOU
    for the meal!! But yeah, thanx for spending the time to discuss
    this issue here on your internet site.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular