बरेच दिवस झाले आमचे एसटी कामगार आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहे पण अजून ही या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत.म्हणतात ना! ज्याचं जळतं त्यालाच कळतं.किती तरी दिवस संप कधी मिटेल म्हणून डोळे लावून बसलेल्या माझ्या बांधवांना कधी न्याय मिळेल यावर भाष्य केलेली रचना!
जाग येईल का?
सरकारला जाग येईल का?
संप मिटवायच्या हालचालींना वेग आज येईल का?
संप करत आहेत एसटी कर्मचारी बाजू त्यांची ऐकाल का?
कंबरड मोडलं प्रवास करून त्यांच्या प्रश्नांसाठी जाग तुम्हा येईल का?
एसटीच्या आमच्या बांधवांना न्यायालय तरी दाद देईल का ?
संप मिटवायच्या हालचालींना वेग आज येईल का……।1।
मुलुख सारा पिंजून काढतात शरीराची होते चाळण
अपेक्षा आहे मायबाप सरकार नका करू त्यांचं वाळण
तुटपुंजा पगार घेऊन सारे सेवा इमानेइतबारे करतात.
मग पगार वाढ करायला त्यांना तुमचे पाय का मागे सरतात
तुमचेच बांधव आहेत सारे त्यांच्या मागणीला हात द्याल का ?
संप मिटवायच्या हालचालींना वेग आज येईल का…….।2।
कमी किमतीत एसटीपासच्या शिक्षण पूर्ण केलं आम्ही
एसटीच्या धुळीत सारे नाचलो पाठीमागे आम्ही
घड्याळ ही पाठ होतं तेव्हा फाट्यावर पोहचत होतो आम्ही
पांढरे कपडे घालून तेव्हा पुढे बसत होता ना तुम्ही
उपकार मानून एसटीचे तहाचा विचार मनात तुमच्या येईल का?
संप मिटवायच्या हालचालींना वेग आज येईल का…….।3।
नाचरा आहे ओ संसार साऱ्यांचा,पगारच किती देता
मनात तुमच्या आहे तरी काय अजून का अंत पाहता
लढता लढता संसार भितीने बरेच जण कोसळले
विस्कटलेल्या कुटुंबाची त्या घडी बसवण्या पुढे लवकर याल का ?
संप मिटवायच्या हालचालींना वेग आज येईल का…….।4।
बसा एकदा जमिनीवर साहेब संपकऱ्यांच्या संपात
मोठ्याने राहू दे आपुलकीने विचारा त्यांच्या कानात
एवढे दिवस अट्टाहास करत का बसलेत उन्हात
काळजी पोटी विचार करून त्यांचा,योग्य मेळ साधाल का?
संप मिटवायच्या हालचालींना वेग आज येईल का ……।5।
कृष्णा शिलवंत
मुख्यसंपादक