सुनसान रस्त्यावरून चालताना
सहज नजर स्मशानाकडे वळली
सगळीच मयत लोकांची चर्चा खूप रंगली होती
डोकावून पाहण्यापासून आवरले नाही
म्हणून पाहिले
तर ते ,
स्वतःच्या चुकांचे पाडा वाचत होते
आपले कोण परके कोण ते त्यांने ओळखले होते,
पण थोडे आता उशीरच झाले हाेते
जीवनाचे अर्थ त्यांना कळले तर होते ,
पण जगणे आता नशिबी नव्हते
आपले म्हणणाऱ्यांचे वागणे पाहत होते
आपले असूनही परकीच असतात लोक ,
हे शहाणपण त्यांना मेल्यानंतर मात्र आले होते
आता खऱ्या अर्थाने ते आनंदी होते,
कारण मरणानंतर त्यांना जगणे समजले होते
नेहा नितीन संखे✍️✍️
समन्वयक – पालघर जिल्हा