१ जानेवारी २०२४ पासून कर्ज खात्यातील दंडाबाबत नवे नियम जारी होतील – RBI
भारतीय रिझर्व्ह बँकेने ( RBI ) सर्वसामान्य कर्जदारांना मोठा दिलासा देत कर्ज खात्यांवर बँकेकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
आरबीआयच्या परिपत्रकानुसार ही नवीन मार्गदर्शक तत्त्वे पुढील वर्षी म्हणजेच १ जानेवारी २०२४ पासून लागू होतील.
पहा कशा आहेत मार्गदर्शक सूचना
बँका आणि इतर वित्तीय संस्था महसूल वाढवण्यासाठी कर्ज खात्यावर दंड आकारू शकत नाही. कर्ज हप्ता चुकल्यास बँकांकडून आकारला जाणारा दंड हा दंडात्मक व्याज म्हणून नाहीतर दंडात्मक शुल्क म्हणून आकारला जाईल.
- यामध्ये लघु वित्त बँका, स्थानिक क्षेत्र बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसह सर्व व्यावसायिक बँका तसेच पेमेंट बँकांनाही हे नियम लागू होतील.
- तसेच सर्व प्राथमिक नागरी सहकारी बँका, NBFC आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या, एक्झिम बँक, NABARD, NHB, SIDBI आणि NaBFID सारख्या अखिल भारतीय वित्तीय संस्था देखील आरबीआयच्या या मार्गदर्शक तत्त्वांच्या कक्षेत येतील, असेही RBI ने म्हटले आहे.
मुख्यसंपादक