जरा इकडे येते का गं ?
आपले हातातले काम बाजूला टाकून ती लगेच त्याच्या जवळ प्रकटली…..
काय झालं बोला…..
अगं हे शर्टच बटन बघ ना तुटलं आताच, जरा….
हो…देते शिवून थांबा जरा, असं म्हणून ती सुई-दोरा आणायला किचन मध्ये गेली…
तिच्या मागोमाग हा पण धावला तशी ती म्हणाली, थांबा इथेच ….
सुई-दोरा घेऊन शर्टचं बटन शिवत असताना तिने आपली नजर वर केली तर हा फक्त तिच्या कमरेत हाताचा विळखा घालून तिच्या चेहऱ्याकडेच पाहत बसलेला…
एक चापटी त्याच्या गालावर बसली तसा तो भानावर आला…
झालं शिवून बटन, जा आता गप्प कामावर….
अगं हे बघ अजून एक तुटलंय बटन….. हसत हसत कुठल्यातरी बटनावर एक बोट ठेवून तो तिला लाडीकपणे म्हणाला…..
ती तोंड मुरडून आपले हातातले काम करायला निघून गेली…
काय गं स्वाती आज डब्यात भाजी काय दिलीयस…….
अहो काल येताना तुम्हीच आणलीत ना कोबीची भाजी…तीच आहे डब्याला आज …!
बरं-बरं – सगळ्या बायका कोबीची भाजीच का बनवतात काय माहीत ….!
अरे ….मीच आणली होती ना पण….मला पाहिजे असणारी आणायला हवी होती ना ….. आज बघू कोणती चांगली मिळतेय का येताना …..भाजी…
रघु आपल्या घरातून कामावर निघताना आपल्या पत्नीशी संवाद करत बाहेर पडला…..
समोरच रस्ता असल्यामुळे, बस स्टॉप ला थांबलेली बस पाहीली आणि त्याने धावतच ती बस पकडली…..
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
अरे तुम्हाला ना लाजा वाटल्या पाहिजेत लाजा, एक काम धड करता येत नाही, कशाला कामाला येता देव जाणे, काही उपयोग नाही तुमचा, फक्त महिना झाला की पगार घ्यायचा आणि संपेपर्यंत उडवायचा एवढंच येत तुम्हा सगळ्यांना……
“रणधीर शृंगारपुरे”
“शृंगारपुरे अँड कंपनी”चा मालक…..
आपल्या सहकाऱ्यांकडून वेळेत काम पूर्ण न झाल्याने सगळ्यांना एका लाईन मध्ये उभे करून घसा फोडून ओरडत होता….
तेवढ्यात रघु ऑफिस मध्ये आला…..
तसं सगळ्यांच्या जिवात जीव आला……
हो, या या साहेब, आम्ही सर्व इथे, आपलीच वाट पाहत उभे आहोत…
साहेबांची भाषा ऐकून रघु समजून गेला, कालच्या अर्धवट कामामुळे ही यांच्या तोंडावर आलेली मांदियाळी आहे…
रघु अगदी रोजच्या प्रमाणेच आपले बूट काढून, सगळे उभे होते त्यांच्या बाजूला जाऊन उभा राहिला…..
तसं अरविंद ने पाठीमागून त्याच्या दोन्ही खांद्याला पकडून सगळ्यात पुढे नेऊन उभा केला….
आजही नेहमी प्रमाणे तूच आम्हाला सांभाळून न्यायचे आहेस,
तुला जे काही बोलायचे आहे ते बोल पण आज काय तो सोक्ष-मोक्ष होऊन जाऊदे…
साहेबांना माहीत होते, एवढा वेळ माझं बोलणे शांतपणे हे लोक ऐकत होते, कारण रघु आला नव्हता म्हणून, आता आला तर त्याला पुढे करतायत हे सगळे….
काय रे अरविंद, काय आणि कसला सोक्ष-मोक्ष म्हणतोयस रे…
हो साहेब तो बरोबर म्हणतोय…रघु बोलता झाला….
साहेब आपल्याला माहीतच असेल मागच्या वर्षी जो आम्ही टेंडर पास करून दिला होता, त्यावेळी आपण म्हणाला होतात की, जर हा टेंडर पास झाला तर तुमचा पगार २० टक्के वाढवेन म्हणून…
पण अस काही झालंच नाही…
आणि एवढ्या दिवसापासून आम्ही मेहनत करतोय सर, आम्ही सर्वांनी मागच्या वर्षी सारखं, शीतल ला प्रेझेंटेशन साठी पाठवायचं ठरवलं होतं, तर आपणच म्हणालात, तिला नाही जमणार…
काल आम्ही रात्री दोन वाजता घरी गेलो सगळे आपण मात्र गेलात बरोबर दहा वाजता….!
माफ करा सर, थोडं जास्तच बोललो मी, पण हेच योग्य आहे…
शृंगारपुरे फक्त ऐकतच होते, काहीच न बोलता सरळ केबिन मध्ये निघून गेले….
रघु खूप चांगलं बोललास….
केतन ने येऊन हस्तांदोलन करत म्हटले….
अचानक पुन्हा साहेब केबिन मधून बाहेर आले…….
त्यांच्या चेहऱ्यावर मघासारखा विश्वास दिसत नव्हता, आपण काहीतरी चूक केली ही भावना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती….
साहेब बाहेर आल्याबरोबर सगळे जागेवर उभे राहिले…
बसा बसा आजपर्यंत हा मान तुम्ही सगळ्यांनी पाळलात, परंतु आज मी सगळ्यांना खूप ओरडलो, खूप काही बोललो, तुमच्या प्रत्येकाच्या घरात काय चालले असेल, याचा थोडाही विचार न करता मी फक्त बोलत होतो…
माझं ऑफिस आहे म्हणून मी तुमच्यावर ओरडू शकतो, पण…पण तुम्ही फक्त बोलू शकता…
साहेबांच्या चेहऱ्यावर काळजी ची सावली आता प्रत्येकाला जाणवत होती….
सुषमा तशीच पुढे जाऊन साहेबांना म्हणाली….
साहेब, माफ करा पण आम्ही त्या प्रोजेक्ट साठी खूप मेहनत घेतली होती, आम्हाला सर्वांना खात्री नाही तर विश्वासच होता की, टेंडर आपल्यालाच मिळणार, पण असं कसं झालं काय माहीत…..
हो साहेब, आम्ही सर्वांनी मिळून अगदी काटेकोरपणे तो प्रोजेक्ट बनवला होता, साहेब आम्ही घरी असतानाही जागून, एकमेकांना फोन करून, तो प्रोजेक्ट तयार केला होता….
सुशांत ने अगदी ठामपणे आपले म्हणणे मांडले……
रघूने साहेबांच्या जवळ जाऊन विचारले….
साहेब काय झालं … आपण कसला विचार करताय…..
काही नाही रघु, तुम्ही सर्वांनी खूप मेहनत घेतलीय हे मला माहित आहे, आणि आपल्यालाच टेंडर मिळाला असता पण ….
पण काय साहेब…
रघूने विचारले…….
“अनामिका इंटरप्राइजेस” ……
या कंपनीने काहीतरी घोटाळा करून आपला टेंडर हिसकावून घेतला आहे…हे मला आताच त्यांच्याच एका ऑफिसरने फोन करून सांगितले आहे….
मग साहेब आपण आता काय करू शकतो ?
एकच मार्ग आहे, तो म्हणजे कोर्ट केस !!
हो सर, बरोबर आहे पण आमच्यावर जो असाच अन्याय गेल्या काही वर्षांपासून होतोय त्याचं काय ?
रघु काय बोलतोयस तू, ……
हो साहेब, आज पर्यंत आम्ही कोणीच बोललो नाही, कारण आपले वडील “दामोदर शृंगारपुरे” होते तेव्हा आम्हाला सांभाळून घ्यायचे, पण आपण तसे नाही आहात…..
सगळंच अगदी साहेबांच्या तोंडावरच बोलल्यावर इतरांना वाटले, आता काही रघूचं खरं नाही….
पण साहेब शांतपणे हाताची घडी घालून केबिनच्या टोकावर दरवाजाला टेकून, ऐकत उभे होते…..
आज एक टेंडर गेलं म्हणून आपण एवढे खचून गेलात, मग आम्ही काय करायला हवं होतं, आमच्याही मनात कोर्ट केस करायची असं आलं होतं, पण आम्ही आपल्या वडिलांनी आमच्यावर पुत्रवत केलेली माया पाहून नाही गेलो….
आमचा पगार आम्ही कधीच मागितला नाही, एकाने कोणी आवाज काढला तर त्याला आपण कायद्याकडे बोट दाखवून गप्प करत होतात, पण आता नाही, आज मी आमच्या सर्वांसाठी लढणार……!
रघु आज खूपच गंभीर भासत होता, बोलण्यातही एक आत्मविश्वास होता……
अरविंद..! त्या “अनामिका एंटरप्राईज”ला फोन लाव आणि साहेबांना ट्रान्सफर कर…..रघु संतापाणेच म्हणाला….
साहेब मात्र काहीच न बोलता आपल्या केबिन मध्ये जाऊन बसले….
अरविंद ने फोन करून कॉल साहेबांना ट्रान्सफर केला ….
साहेब फोन उचलायच्या आधी रघूने तो फोन उचलून आपल्याच कानाला लावला…
हॅलो – मी “रणधीर शृंगारपुरे” बोलतोय….
हॅलो – मी सुयोग कंगारे “अनामिक एंटरप्राइज…
रघु – आपण जो काही टेंडर विषयी चालवलेला खेळ आहे तो लवकरात लवकर संपवावा अन्यथा, आम्ही कोर्टाची पायरी चढण्यास मागे पुढे पाहणार नाहीत, हे लक्षात घ्या…..
रघुने अगदी साहेबांसरखंच पण एकदम कणखर आवाजात फोनवर बोलत होता…..
आणि ….साहेब मात्र त्याच्या तोंडाकडे बघतच राहिले होते….
सुयोग – आपण म्हणताय असं काही नाही आहे, आमचे प्रोजेक्ट अव्वल ठरले म्हणूनच ते टेंडर आम्हाला मिळालंय इतकंच…..
रघु – इतकंच ..!! इतकंच म्हणत आहात तुम्ही, अहो आपण एकाच स्तरावरील माणसे आहोत, तसंही आम्हाला बाहेरून कळलंच आहे तुम्ही काय करून टेंडर मिळवलं आहे ते….. एखाद्याच नुकसान करून काय मिळालंय कुणाला आणि तुम्हाला तरी काय मिळणार आहे,…..
पैसा…अहो साहेब हा पैसा इमानदारीने कमावला तरंच खिशात टिकतो, नाहीतर तिपटीने खिशातून जातो…
हे बोलणे सुयोग च्या अगदी काळजाला लागलं, म्हणतात ना “कोणीही किती पैसेवाला असुद्या त्यालाही काळीज असतंच,”
असंच काहीसं इथेही झालं….
सुयोग – आपले म्हणणे बरोबर आहे, हे मला उशिरा सुचलेले शहाणपण आहे म्हणा हवंतर, मी लगेच आमच्या टीम ला सांगून टेंडर परत करतो…..
रघु – धन्यवाद साहेब, आपण आम्हाला आणि आमच्या केलेल्या कामाला समजून घेतलेत……
धन्यवाद…तुमचे साहेब.
सगळेजण रघुकडे बघत राहिले होते…..
साहेब तर जागेवर उभे राहून राघूला सलाम करत होते…..
आणि साहेबांनी आनंदाच्या भरात एक अनाउंसमेंट केली…..
आपल्या ऑफिस मधील मॅनेजर ची पोस्ट बऱ्याच दिवसांपासून रिक्त आहे, ती पोस्ट आता रघु सांभाळेल….
एक मिनिटं साहेब, मी ही पोस्ट मिळावी म्हणून नाही बोललो, तर आपल्यालाही कळेल की आम्ही आपल्या या कंपनीसाठी काहीही करू शकतो, म्हणून …..
आणि या माझ्या सहकाऱ्यांची मला साथ होती म्हणूनच मी हे करू शकलो….
साहेब – हो रघु तू बरोबर बोलतोयस ..! आम्ही बॉस लोकं कधीच वर्कर लोकांना समजून घेत नाही, आज खरच तू माझे डोळे उघडलेस….
तुझी पोस्ट तुला मिळेलच आणि याच महिन्यापासून सर्वांचे पगार २०टक्के नाही तर ३०टक्के वाढवून देतो असे मी, माझ्या वडिलांच्या फोटोसमोर हात जोडून सगळ्यांना सांगत आहे…..
आणि खरोखरच साहेबांनी वडिलांच्या फोटोसमोर हात जोडले ..!!
रघूला अरविंदने उचलून खांद्यावर घेतले आणि नाचायला लागला….
रघु आज तुझ्यामुळे आम्हाला हे दिवस बघायला मिळाले, आम्ही हा दिवस कधीच विसरणार नाही….आणि तुलाही….
अरविंद रघूला खांद्यावर घेऊनच वर मान करून त्याच्याशी बोलत होता…..
आमच्यात एवढी साहेबांसमोर बोलायची हिम्मतच नव्हती कधी, ती हिम्मत तुम्ही दाखवलीत आणि आम्हा सगळ्यांना आजचा दिवस पाहायला मिळाला….
सुषमा रघुच्या बाजूला येऊन म्हणाली…
अहो सुषमा ताई….
तुम्ही सगळे माझ्या बरोबर उभे राहिलात म्हणून मी बोलू शकलो, आज माझं घर आहे तसेच तुमचं सगळ्यांचंही आहेच ना….
मला ते कळलं, आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहिल्याने हे घडले….
रघुने, सगळे श्रेय सर्व सहकाऱ्यांनाच देऊन टाकले……
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
साहेब – काल तर चांगला म्हणाला ना रे, तो सुयोग मी टेंडर परत करतो म्हणून ….मग …
अरविंद – मग काय साहेब, काय झालं…..
सुषमा – हो साहेब काय झाले, रघु दादांनी तर चांगलेच काल खडसावले होते त्या अनामीकाला…..
शीतल – साहेब जाऊदे, आपण पुढच्या वर्षी पुन्हा टेंडर भरूया…मग तर झालं…
साहेब – शीतल सगळ्यात आधी तुम्ही मला माफ करा, जर याही वेळी तुम्हाला प्रेझेन्टेशन साठी पाठवलं असतं तर, ही नामुष्की झाली नसती, मला माफ करा….आणि साहेबांनी खरोखरंच हात जोडले….
धावतच बस पकडून अगदी आनंदात ऑफिसमध्ये आलेला रघु सगळ्यांचे चेहरे बघून काळजीत पडला….
त्याला समजले होते की ते टेंडर शासनाने आपल्याच कंपनीला पास करून दिले आहे…..
पण मग हे सगळे असे काळजीत का बसले आहेत…..
रघु आत आला तसे सर्व उठून उभे राहिले आणि त्याच्याकडे बघतच राहिले, साहेब ही उठून उभे राहिले होते……
काय झालं का काळजीत आहात आपण सगळे?
टेंडर तर आपल्यालाच मिळालंय ना !!
एवढं ऐकले आणि सगळ्यांचे चेहरे आनंदाने भरून वाहायला लागले, आता सगळे साहेबांकडे पहायला लागले……
अरे मी गम्मत करत होतो तुमची….
आणि हो, टेंडर आपल्यालाच मिळालंय आणि…..
खरंच मला माफ करा – आज कदाचित रघु नसता तर मला माझी चूक कळलीच नसती……
आजपर्यंत मी तुम्हाला माझ्या तालावर नाचवत होतो, एक कठपुतली सारखं, मी म्हणेन तसं तुम्ही सगळे करत होतात, वागत होतात, ऑफिस फक्त ऑफिसच वाटत होतं,…….
पण आज पासून माझ्यासाहित सर्वांनी मिळून मिसळून राहायचं, आणि प्रत्येकाला इथे बोलण्याची मुभा दिली जाईल, कोणत्याही गोष्टीत प्रत्येकाने आपले मत मांडायचे, माझी काहीच हरकत नसेल….
आजपासून हे एक आपले कुटुंब असेल…..
आणि सर्वांनी आपला मोर्चा रघुकडे वळवला आणि त्याला अक्षरशः डोक्यावर घेतले…..
पुढे शासनाचे सलग सात टेंडर “शृंगारपुरे अँड कंपनी”लाच मिळाले होते, आणि तेही “शीतल सरनाईक” यांनी केलेल्या प्रभावी प्रेझेन्टेशन मुळेच…….
आज रघुने सर्वांचे मन जिंकले होते, सर्वांच्या मनात त्याच्या-विषयी एक मानाची जागा निर्माण झाली होती, आणि एका विशिष्ट अशा उच्च पदावर पोहचला होता…….
लेखक -
- विजय वैशाली दत्ताराम पराडकर
( आण्णा )
मुख्यसंपादक
nice story👍👌