आचारसंहिता हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकतो पण आचारसंहिता म्हणजे काय ? आणि ती कशी अमलात आणली जाते ? त्याची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी रमेश एका प्रतिष्ठित दादा न कडे गेला होता . पण दादांना आचारसंहिते मध्ये काय करायचे असते काय नाही ह्याची कल्पना नव्हती त्यांना फक्त आचारसंहिता लागू झाली एवढच कळत .मग काय त्यांना तुम्हाला काय कळत हे तोंडावर बोलण्याची हिम्मत रमेश सारखा नवखा कार्यकर्ता कुठून आणणार उठला आणि घराकडे निघाला पण विचार काही जात नव्हते. शेवटी त्यांनी त्या बद्दल माहिती घ्यायची असा निश्चय केलाच..
तेव्हा त्याला समजलं ; राजकीय पक्षांनी आणि उमेदवारांनी निवडणुकीच्या काळात काय करावे आणि काय नाही म्हणजे आचारसंहिता होय.
१) समाजातील जाती धर्मात , वंश , बोलीभाषा यामध्ये फूट पडेल किंवा त्यांच्यात वाद निर्माण होतील असं कोणतेही भाषण , प्रचार आश्वासन, व घोषणा पक्ष व उमेदवारांनी देऊ नयेत .
२) कुठल्याही प्रतिस्पर्धी पक्षाच्या सभा , मिरवणूक, भाषण यात अथडला आणू नये अन्यथा त्या उमेदवाराची उमेदवारी निवडणूक आयोग रद्द करू शकते.
३) पक्ष किंवा सरकार यांना आर्थिक लाभ , मनोरंजनात्मक योजनाची अंमलबजावणी बंद करावी लागते.
४) कोणत्याही पक्षाला सरकारी वाहने , विमाने , आणि हेलिकॉप्टर प्रचारासाठी वापरता येत नाहीत. सरकारी गेस्ट हाऊस वर हक्क सांगता येणार नाही
५) आचारसंहिता मंत्र्यांना सुद्धा लागू असते , या दरम्यान कोणत्याही मंत्रांना रस्ता , पाणी , वीज अश्या विकास कामाची आश्वासन देता येत नाही . तसेच निवडणुकीवर परिणाम होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करता येत नाहीत.
हे राजकारणाच्या मैदानात असल्याचे पण सामान्य माणसाचे नियम काय ?
जन्म दाखला , विवाह नोंदणी, आधार कार्ड, पासपोर्ट , लायसन्स , उत्पन्न दाखला अशी बरीच कामे काही प्रशासकीय अधिकारी आचारसंहिता कारण दाखवून करत नाहीत पण त्याचा आचारसंहिते शी काहीच संबध नसतो. फक्त काही मंडळी अशी कारण देऊन तुमचं काम चालढकल करण्याचा प्रयत्न करत असतात इतकंच. फक्त या काळात सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही.
- – संकलन – लिंक मराठी टीम
- – शब्दांकन – अमित गुरव
मुख्यसंपादक
[…] आचारसंहिता म्हणजे काय ? […]