काही व्यक्ती जन्मतः मोठ्या असतात , काही व्यक्तिंवर मोठेपण लादले जाते , तर काही व्यक्ती स्वकर्तृत्वाने मोठ्या होतात . जालना जिल्ह्यातील महाराष्ट्र वीज वितरण कंपनी परिमंडळ जालना चे अधिक्षक अभियंता आदरणीय श्री अर्शदखान पठाण हे सुरुवातीला विल्यम शेक्सपियर यांचे जे वचन दिले आहे त्या तिसर्या म्हणजे स्वकर्तृत्वाने मोठ्या होणार्या यादीमध्ये पठाण साहेब तंतोतंत बसतात . नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात सावरगाव पिरजादा नावाच्या लहानशा खेड्यात पठाण साहेबांचा जन्म झाला. वडील शेतकरी. परिस्थिती प्रतिकूल, परंतु “कार्य कठीण है इसलिये करणे योग्य है” | हा पठाण साहेबांचा स्वभाव . “याहूनही करावे विशेष” हा त्यांचा पिंड . प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल सावरगाव पिरजादा सारख्या खेड्यात झाले . आपण समाजात वावरत असताना समाजाचे काही देणे लागत असतो ही अर्दशखान साहेबांची प्रेरणा होती . ते देणे देत असताना संकटे किती ही येवोत त्याची परवा मी करणार नाही हा आमच्या मित्राचा बाणा . “तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची पर्वा बी कुणाची” हे ध्येय उराशी बाळगून पठाण साहेबांनी आपली शैक्षणिक वाटचाल पुढे नेटाने चालू ठेवली .अर्दशखान यांचे पितृछत्र लहानपणीच हरवले. त्यांची शैक्षणिक आवड ओळखून त्यांचे मोठे बंधू व बहिणी यांनी त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली . अर्दशखान हे एकूण सहा भाऊ ते आजपर्यंत एकत्र कुटुंब पद्धतीचाच स्वीकार करतात हे विशेष.
त्या एकत्रीकरणाचा परिणाम म्हणजे सगळ्या वडील बंधूंनी व बहिनीनी मिळुन श्री अर्शदखान यांना औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी ची जबाबदारी स्वीकारली . सन 1990 मध्ये अर्शद खान यांनी अभियांत्रिकी ची पदवी प्राप्त केली . पुढे तीन वर्षे त्यांनी एका खासगी कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम केले . नंतर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये त्यांना सन 1994 मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी लागली . तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी भूम, परांडा, केज,नांदेड,रत्नागिरी,सोलापूर , औरंगाबाद व कार्यकारी अभियंता म्हणून जालना येथे ते रुजू झाले . जालना येथेच ते कार्यरत असताना माझा व पठाण साहेबांचा फोन परिचय झाला . त्यांच्या आधीचे कार्यकारी अभियंता श्री सायनेकर साहेब यांचा व माझा संबंध सांगितला तेव्हा दिलखुलासपणे पठाण साहेब मला म्हणाले “अरे कुलकर्णी साहेब हमारे साथ भी दोस्ती कर के देखो” हा त्यांच्या मनाचा मोकळेपणा मला भावला तेव्हापासून पुढे ते जालना येथे टेस्टिंग विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून राहिले . आमच्या फोनवरून गप्पा चालायच्या ग्रामीण भागातील वीज चोरी थांबली पाहिजे , शेतकरी हा नैसर्गिक आपत्तीमध्ये कसा सापडतो व त्यामुळे विज बिल भरणे त्याला कसे अवघड जाते ही कनव व तळमळ पठाण साहेबांच्या बोलण्यातून सदैव व्यक्त होत असते . मीटर धारकांना जसा प्रपंच असतो तसाच महामंडळालाही असतो व त्यासाठी सर्वांनी महामंडळाला सहकार्य केले पाहिजे ते करत असताना महामंडळांनी, अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून प्रत्येकाला उत्तम सेवा दिली पाहिजे मंडळाच्या उणीवा कमी नाहीत असा दोन्ही बाजूचा व हिताचा विचार करणारा हा आगळावेगळा अभियंता सहसा दुर्मिळच असतो . श्री पठाण साहेब परांडा तालुक्यात सेवा देत असताना तेथे डोमगाव नावाच्या गावात समर्थशिष्य कल्याण स्वामींचा मठ आहे. तेथे कल्याण स्वामींच्या हस्ताक्षरातील दासबोधाची हस्तलिखित प्रत पाहिल्याचे ही त्यांनी सांगितले आहे . पठाण साहेबांची मराठी भाषा साहित्य म्हणून जे तिचे मूल्य आहे याची उत्तम जाण पठाण साहेबांना आहे . संतवाग्ड्मयाचा, त्यातल्या भाषेच्या गमती व चमत्कार हा त्यांच्या व्यासंग व अभ्यास याचा त्यांच्या बोलण्यातून प्रत्यय येणारा विषय आहे .
मी पठाण साहेबांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या . त्यावर त्यांनी मला आजच्या या मंगल प्रसंगी अहंकार रुपी रावणाचे दहन करण्याचा आपण संकल्प करूया हा संदेश बोलून तर दाखवलाच , किंबहुणा रामाला त्यांच्या आईने विचारलेला प्रश्न व त्याला रामप्रभू ने दिलेले उत्तर हा तुळशी रामायणाचा प्रसंग उलगडून दाखवणारे हे आगळेवेगळे “पठाण “आहेत . त्यांना पदाचा गर्व नाही . माणसे जोडणे हा त्यांचा ध्यास आहे. जोडलेली मैत्री टिकवण्यासाठी साधना लागत असते. म्हणून परवा त्यांची अधीक्षक अभियंता म्हणून जी पदोन्नती त्यांना मिळाली त्याबद्दल सोलापूर जिल्ह्यातून एकरुखे गावचे तानाजी पाटील नावाचे सद्गृहस्थ पठाण साहेबांचा सत्कार करण्यासाठी जालन्याला येऊन गेले. पठाण साहेब यांच्या जनसंपर्का सोबत ते त्यांच्या कार्यालयातील सहकारी व कर्मचारी यांच्या वरही लक्ष ठेवून असतात , व सतत त्यांची काळजी ही करत असतात . परतूर तालुक्यातील सहाय्यक अभियंता श्री बेंडाळे साहेब यांनी जो अभिप्राय दिला तो अत्यंत बोलका आहे ते म्हणतात की “पठाण साहेब म्हणजे एक कर्तव्यदक्ष अधिकारी व सतत कंपनीच्याच हिताचा विचार करणारे व त्वरित निर्णय घेण्याची क्षमता असलेले अधिकारी आहेत” . माझे स्नेही रमेश आढाव म्हणतात की “सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे व सहकार्य करणारे अधिकारी आहेत ” असा अभिप्राय आहे आष्टीचे कनिष्ठ अभियंता श्री केंद्रे यांचाही असाच अभिप्राय आहे . प्रेम कुणावरही करावे | प्रेम भोगावर करावे| तसेच त्यागावर ही करावे | प्रेम कुणावरही करावे| अधीक्षक अभियंता पठाण साहेब यांच्या सहधर्मचारिणी सौ मुबीन बेगम ह्या उत्तम आतिथ्यशील वृतीच्या आहेत . पठाण साहेबांच्या नोकरीच्या भटकंतीच्या काळात ह्या पठाण साहेबांचा गृहस्थाश्रम सांभाळतात . म्हणूनच पठाण साहेब एवढे मोठे झाले . त्यांच्या पदोन्नती बद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा , ” हे भगवान मुझे दुनिया की सेवा करने का वरदान दो | दुखियोके दुख मिटासकु मैं ऐसी शक्ती महान दो |
या प्रेरणेसह पठाण साहेबांना धामणगाव च्या वतीने सलाम .
- दिपक शामराव कुलकर्णी
https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303
महाराष्ट्रात लोकप्रिय होत असल्येल्या Link मराठी पोर्टल मध्ये स्वतःच्या नाव सह आपले लेख- कविता प्रकाशित करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी फॉर्म भरावा आणि आपल्या लेखन कॉपी-पेस्ट होण्याच्या चिंता दूर करावी. आमची टीम लवकरच संपर्क साधेल. वर
www.linkmarathi.com
मुख्यसंपादक