ओवाळणीच्या ताटात
दोन हजारांच्या नोटा
टाकून झाल्यावर……..
त्याने तो कागद हळूच पुढे केला
आणि त्यावरची
लहानशी रिकामी जागा दाखवत म्हणाला…
ताई इथं तुझा अंगठा हवाय फक्त…
ती म्हणाली
दादा तुझ्यात आणि माझ्यात एकाच
का रे बापाचे रक्त…?
होत नव्हतं तुझंच तर आहे..
त्यात माझं काय आहे
आण तो कागद
असं म्हणत तिने
कागद हातात घेतला
आणि पाणावलेल्या डोळ्यांनी
हुंदके देत म्हणाली
दादा अंगठा देते…..
फक्त
एक वचन देऊन जा
वर्षभर आला नाहीस तरी चालेल
दर भाऊबीजेला मात्र न चुकता येत जा..
माय बाप गेलं
आत्ता माहेरही रुसलं आहे..
मातीतल्या नात्याचं नावही
पुसलं आहे..
मुलांना चांदोमामाची ती
रोज गोष्ट सांगते..
मुलं झोपी जातात तेव्हा..
तिच्या डोळ्यात जत्रा
माहेरची पांगते..
सुखी ठेव देवा भाऊराया माझा
नवस रोज मागते..
किती किती किती…..
सांगते कौतुक भावाचं सासरी..
अन तिच्या माहेरात
फक्त तिची
वाट पाहते ओसरी…
दंगलकार नितीन चंदनशिवे
कवठेमहांकाळ
सांगली.
https://surveyheart.com/form/615fcb6ec182fe215fb90303
महाराष्ट्रात लोकप्रिय होत असल्येल्या Link मराठी पोर्टल मध्ये स्वतःच्या नाव सह आपले लेख- कविता प्रकाशित करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी फॉर्म भरावा आणि आपल्या लेखन कॉपी-पेस्ट होण्याच्या चिंता दूर करावी. आमची टीम लवकरच संपर्क साधेल.
www.linkmarathi.com
मो.7020909521
मुख्यसंपादक