कॉलेजच्या दिवसाची
गंमत असते न्यारी
स्वप्नात असते एक
गुलाबी ती परी..
दंगामस्ती मित्रांसंगे
खूप करायचो धमाल
पैसा नव्हता खिशात
पण दाखवायचो कमाल…
टोपण नाव ठेवलेले
व्हायची चिडवाचिडवी
कॉलेज सुटल्यावर
रस्ता आडवा आडवी…..
मित्र होते जिवलग
त्यांचाच डबा खायचा
रूममध्ये त्याच्याच राहून
त्याचाच शर्ट घालायचा….
कॉलेजला दांडी मारून
थापा मारत बसायच
गृहपाठावर नकली सही
स्वतःलाच हिरो समजायचं…
- कवी किसन आटोळे सर
मुख्यसंपादक