वृत्त – कालगंगा/ देवप्रिया
लगावली – गालगागा गालगागा गालगागा गालगा
काफिया – खोडलेले,कोरलेले,भोगलेले,लोपलेले,शोधलेले,सोडलेले, जोडलेले.
रदीफ – नांव ते
" कोरलेले नांव ते"
कागदावर वंचितांचे खोडलेले नांव ते
भाकरीवर “भीमराया” कोरलेले नांव ते
भोग सारे जीवनाचे बेहिशोबी सोसले,
दीन दुबळ्या शोषितांचे भोगलेले नांव ते.
जन्म होता बा भीमाने श्वास केले मोकळे
शोषणाऱ्या दानवांचे लोपलेले नांव ते.
माणसाने माणसाला जातपाती त्यागले
स्वार्थ त्यांचे साधण्याला शोधलेले नांव ते.
जिंदगी वाळीत होती आसवांची वादळे
झोपड्यांनी कारुण्याचे सोडलेले नांव ते.
धर्मभेदी वागण्याने शिक्षणाला रोखले
संविधानाशी सदैवी जोडलेले नांव ते.
नितीन सुर्वे (श्रीवर्धन)
समन्वयक – पालघर जिल्हा
[…] ” कोरलेले नांव ते “ अमित गुरव […]