खणखर हो तू अशी नारी तोंडात सारे बोटं घालतील
डाव टाकणारे असोत कोणी एक पाऊल मागे सरतील
बिशात काय त्या लांडग्याची हल्ला जे तुझ्यावर करतील
सदैव ठेव तयार खडग प्रसंगी शीर तू उडवून टाकशील
बहाद्दर हो अशी तू नारी सारे तुला वचकून राहतील…।1।
कर काबीज नव्यानं सारं नावं ठेवे कोन्यात बसतील चढू दे कमान शिखराला तुझी नाक मुरडे मोडून पडतील
नाव तुझं होऊ दे असं
आदर्शाची तू कमान बनशील
बहाद्दर हो अशी तू नारी सारे तुला वचकून राहतील….।2।
डावपेचात नको पडू मागे
राजकारण ही पुढंचं करशील मी मी म्हणणारे टुकार नेते हातावर हात चोळत बसतील सासू,सासरे,नवरा,नातलग भले तुला विरोध करतील। वजन होऊ दे वजनदार साऱ्यांची तू मिशाल बनशील
बहाद्दर हो अशी तू नारी सारे तुला वचकून राहतील….।3।
लढत नाहीस मग कळ सोस
गुलाम म्हणून बघत राहशील
विचारांना वळकट दे मजबूत
समोरच्याला घायाळ करशील
तू शोध बाई तुझ्यात दडलेलं
जीवन तुझं उजळून काढशील
बहाद्दर हो अशी तू नारी सारे तुला वचकून राहतील….।4।
इकडं तिकडं वेचक पाहायचं
ओढणारे हात पुढे असतील
छाटायला ही राहू नको मागे
शिबांचे वर सोबत दिसतील
गतीने टाक एक पाऊल पुढचे
विचार तुझे आदर्श वाटतील
बहाद्दर हो अशी तू नारी सारे तुला वचकून राहतील….।5।
✍ कृष्णा शिलवंत
मुख्यसंपादक