१६६४ मध्ये शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असे शब्द वापरले जातात. परंतु ती लुट नव्हती ती वसुली होती. बादशहाची सेना वारंवार स्वराज्यातील जनतेला त्रास देत असे, त्यामुळे स्वराज्याच्या रक्षणासाठी महाराजांना मोठे सैन्य उभे करावे लागले. या सैन्याच्या खर्चाची जबाबदारी महाराजांचीच म्हणजे स्वराज्याची. मोगलांपासुन स्वराज्याचे संरक्षण करण्याकरता महाराजांनी जो खर्च केला तो वेळोवेळी अश्या प्रकारे जमा झालेल्या पैशातुनच. ही लुट नव्हती स्वराज्याच्या रक्षणासाठी केलेली वसुली होती…
महाराजांचे सैनिक सुरतेमध्ये धामधूम करत असताना एक डच विधवा भयंकर अस्वस्थ झाली होती.ती प्रचंड घाबरली होती.तिच्या घरात फक्त तिच्या दोन तरूण मुली होत्या. शिवाजी महाराजांचे सैनिक माझ्या घरात घुसतील आणि आमच्या अब्रुचे धिंडवडे काढतील असं तिला वाटतं होतं. ती मनातल्या मनांत देवाची प्रार्थना करत होती.इतक्यात दरवाजा वाजला ती दरवाजा उघडायला तयार नव्हती. परंतु दरवाजा वाजवणारा दुभाषी शांत स्वरात तिला दरवाजा उघडण्याची विनंती करत होता
अभय देण्याची भाषा करत होता. अश्या वेळेला घाबरतच तिने दरवाजा उघडला. तो दुभाषी हात जोडून तिच्यापुढे उभा राहिला. ती आश्चर्यचकित झाली, शिवाजी महाराजांची माणसं शस्त्र घेऊन आता घरात घुसतील अशी तिला भिती वाटत होती. पण तो दुभाषी म्हणाला “ आमचे महाराज स्त्रियांना मातेसमान मानतात. तुमच्या पतीने जिवंत असताना खुप दानधर्म केला आहे. कोणताही भेदभाव केला नाही याची महाराजांना माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला कोणी त्रास देऊ नये यासाठी महाराजांनी तुम्हाला दोन संरक्षक दिले आहेत.
तुम्ही आता निश्चिंत व्हा. तुम्हाला हा संदेश देण्यासाठीच महाराजांनी मला पाठविले आहे. ”हे ऐकुण तिच्या डोळ्यात पाणी आलं नकळत तिने आकाश्यातल्या बापाला प्रार्थना केली “या सद्विचारी राजाला तु दिर्घायुष्य दे. !”
छत्रपती शिवाजी महाराजांसारखा थोर राजा इतिहासात एकमेव अद्वितीय. त्यांच्यावर समाजाचा प्रचंड विश्वास. या विधवा स्त्रीच्या अंतःकरणात शिवाजी महाराजांविषयी कोणत्या भावना निर्माण झाल्या असतील याची तुम्ही कल्पना करा…
अश्या असंख्य माणसांच्या ह्रदयाचे स्वामी होते आपले शिवराय. कारण त्यांचे चारित्र्य शुद्ध होते.वैयक्तिक जीवन आणि सार्वजनिक जीवन असा कोणताही फरक त्यांच्या चरित्रात नाही.परकिय नागरिकांनासुद्धा पुज्य वाटणारे शिवराय आमच्यासाठी तर परमेश्वर स्वरूपच आहेत…
मुख्यसंपादक