Homeआरोग्यजास्वंदीचे फूल औषधी गुणधर्म व उपयोग महत्त्व

जास्वंदीचे फूल औषधी गुणधर्म व उपयोग महत्त्व

जास्वंदीच्या फुलाचे आपल्या आरोग्यास नानाविविध गुणकारी फायदे आहेत. पण आपण ते फक्त गणपतीचे आवडते फुल आहे म्हणून त्यांनाच वाहतो.
आपण कदाचित लहान असताना त्या फुलांच्या देठाकडील भाग चोखून झाला असेल. त्यामधून जो सर असतो तो खूपच गोड लागतो.

१) तोंड आल्यानंतर जास्वंदी ३-४ पाने दिवसातून ४-५ वेळा चावून खावीत.

२) दहा जास्वंदीची फुले मेथीच्या बिया हाताच्या बोटाच्या आकाराएवढ्या वडाच्या पारंब्या तीन हे सर्व एकत्र येऊन चेचून एक वाटी तीळ तेलामध्ये तळून घ्यावे या तेलामध्ये पाव चमचा भीमसेन कापूर मिसळावा हे मिश्रण एका काचेच्या बरणीत भरून ठेवावे रोज रात्री केसांच्या मुळांना लावून मालिश केले तर केस मजबूत होतात; केसांची गळती थांबते केसांची लांबी वाढते.

३)चाई पडलेल्या ठिकाणी रोज एक ताजी जास्वंदीचे फूल घेऊन चटणी करून चोळावे खूप छान फायदा होतो.

४) दोन लाल जास्वंदीची फुले ३ कप पाण्यामध्ये टाकून उकळावीतत, एक कप झाल्यावर सकाळी उपाशी पोटी कोमट असताना घोट- घोट प्यावे ; त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयाची ताकद वाढते.

५) पांढर्‍या जास्वंदीच्या पानांचा दोन चमचे रस एक चमचा खडीसाखर एकत्र करून सकाळी उपाशीपोटी घ्यावे वरून थोडे पाणी प्यावे यांनी पित्ताचे शमन होते.

६) महिलांना अंगावरून पांढरे किंवा लाल जाण्याची खूप तक्रार असेल तर, सकाळी उपाशी पोटी पांढऱ्या जास्वंदीच्या ३ -४ कळ्या तुपामध्ये परतून घ्याव्यात व खडीसाखर सोबत नियमित खावे.

७) ज्या लोकांना रक्त कमी असते हिमोग्लोबिन (HB )कमी असते अशा लोकांनी लाल जास्वंदीचे फूल एक चमचा खडीसाखर एकत्र करून सकाळी उपाशी पोटी चावून खावे. ज्या लोकांना वारंवार केस तूट किंवा गळती समस्या सतावते अशा लोकांनी लाल जास्वंदीच्या २ कळ्या सकाळी उपाशी पोटी चावून खाव्यात सलग १०-१२ दिवस.

८) ज्या लोकांना मुळव्याध आहे. शौचाला गेल्यानंतर शौचातून रक्त पडते अशा लोकांनी तीन ते चार पांढऱ्या जास्वंदीच्या कळ्या तुपामध्ये परतून घ्याव्यात व एक चमचा खडीसाखर सोबत चावून खावेत.

९) ज्या लोकांना वारंवार केस तूट किंवा गळती समस्या सतावते अशा लोकांनी लाल जास्वंदीच्या २ कळ्या सकाळी उपाशी पोटी चावून खाव्यात सलग १०-१२ दिवस. महिलांना अंगावरून पांढरे किंवा लाल जाण्याची खूप तक्रार असेल तर, सकाळी उपाशी पोटी पांढऱ्या जास्वंदीच्या ३ -४ कळ्या तुपामध्ये परतून घ्याव्यात व खडीसाखर सोबत नियमित खावे.

१०) दोन लाल जास्वंदीची फुले ३ कप पाण्यामध्ये टाकून उकळावीतत, एक कप झाल्यावर सकाळी उपाशी पोटी कोमट असताना घोट- घोट प्यावे ; त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी होते आणि हृदयाची ताकद वाढते.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular