सकाळी सकाळी पूर्वेकडून जे
मनमोहक सूर्यबिंब उगवते
आणि सारे जग त्याबरोबर
आपल्या जीवनाची सुरूवात
करते म्हणूनच मी त्या
वेळेला तुझं नाव दिलय आई. !!
वैशाघातल्या भर दुपारी
उन्हात आग ओकणाऱ्या
सूर्यासमोर अचानक एखादा
ढग येतो अन अंगाला
असाह्य चटके देणार्या
उन्हात कशाचीही तमा न
करता पोटाच्या खळगीसाठी
राबणाऱ्या श्रमिकाला जो
आल्हाददायक गारवा मिळतो
त्या क्षणालाही मी तुझच
नाव दिलंय आई. !!
धो-धो पावसात खोल दूरच्या
खवळलेल्या समुद्रात
जेव्हा एखादी नाव वादळात
गुरफटलेली असते मृत्यूच्या
खाईतून जगण्याची अशाच
सोडून दिलेली असताना
जेव्हा एखादा मदतीचा हात
देतो मरणाऱ्या जीवाला
नवजीवन देतो त्या देवदूताला
ही मी तुझाच नाव दिलंय आई. !!
आई हे दोनच अक्षरांचं नाव
पण विश्व निर्माताही त्यापुढे
नतमस्तक असतो त्या दोन
अक्षरांच्या नावापुढे पूर्ण
ब्रह्मांडाच तीर्थ जरी केलं तरी
सगळ्यांचं दैवत तूच आद्य
आराध्य आहेस आई
गंगा यमुना सरस्वती की
विश्वातल्या कुठल्याही
तीर्थाचे पावित्र्य
तुझ्यापुढे फिक ठरतं इतकं तुझं
नाव पवित्र आहे म्हणूनच
प्रत्येक सुखदुःखाच्या वेळी
नेमकं तुझेच नाव ओठावर येतं आई. !!
- जगन्नाथ काकडे ( मेसखेडा )
मुख्यसंपादक