भावाने पैशासाठी भावाचा जेंव्हा गळा काटला,
तेंव्हाच खरं देव बाटला,
वासनेच्या नादात भावाला जेंव्हा बहिणी मध्ये रस वाटला,
तेंव्हाच खरं देव बाटला,
शरीर सुखासाठी जेंव्हा एक बायको असताना नवऱ्याने दुसरा संसार थाटला,
तेंव्हाच खरं देव बाटला,
सत्तेसाठी जेंव्हा माणसाने नीचपणाचा कळस गाठला,
तेंव्हाच खरं देव बाटला,
स्वतःच्या मस्ती साठी जेंव्हा आई बहिणीच्या पदराला मानवाने हात घातला,
तेंव्हाच खरं देव बाटला,
शिक्षणासारख्या पवित्र सरस्वतीचा स्वार्थासाठी जेंव्हा गळा गोठला,
तेंव्हाच खरं देव बाटला,
पैशाच्या मोहात जेंव्हा कार्यकर्त्याने आपला इमान विकला,
तेंव्हाच खरं देव बाटला,
पर धन जेंव्हा आपल्या बापाचा माल वाटला,
तेंव्हाच खरं देव बाटला,
स्वतःच्या नातलगांच्या अपयशावर जेंव्हा आपलाच माणूस हसला,
तेंव्हाच खरं देव बाटला,
सत्तेसाठी जेंव्हा राजकारण्यांनी देशच विकला,
तेंव्हाच खरं देव बाटला
मित्रानेच स्वत:च्या स्वार्थापायी मित्राचा संसार मोडला
तेव्हाच खरं देव बाटला
मनमौजी आयुष्य जगण्यासाठी जेव्हा मुलाने आई बापाचा त्याग केला
तेव्हाच खरं देव बाटला
मिळालेला आपल्या अधिकारांचा जेव्हा आपणच गैरवापर केला
तेव्हाच खरं देव बाटला
मानवाने जेव्हा मानवा विरूध्द कट केला
तेव्हाच खरं देव बाटला
कवयित्री/लेखिका –
नेहा नितीन संखे ( बोईसर )
समन्वयक – पालघर जिल्हा