जीवन सुख दुःखाचा खेळ
आनंदाने खेळत रहावा
जीवन एकदाच असते
अरे पात्र रंगवत जावा.
कधी हसायचं कधी रडायचं
वेड्या मनोसोक्त जगायचं
जरी गोष्ट एकच असली
पात्र मात्र तू रंगवायचं.
संगीतावर बेभान नाचायचं
गाणं म्हणायचं गुणगुणायच
जीवापाड प्रेम करायचं
खळखळून निर्मळ हसायचं
पहिल्या पावसात भिजायचं
चांगले ते नक्की करायचं
आयुष्य कोरा कागद आहे
आपलं पात्र आपणच रंगवायचं.
कवी: किसन आटोळे
वाहिरा ता आष्टी
मुख्यसंपादक